Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात द्राक्षांचे सुमारे 40 टक्के नुकसान

Share

नाशिक ।  विजय गिते

ङ्गराजाने मारले, पावसाने झोडपले तर तक्रार करायची कोणाकडेफ अशी अवस्था जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची झाली आहे. एकरी दोन ते अडीच लाख खर्च द्राक्ष बाग छाटणीपासून ते द्राक्ष काढणीपर्यंत येतो. मात्र, हा खर्च द्राक्षाचा निम्माच हंगाम संपत आला असताना पूर्णही झाला आहे. त्यामुळे पुढील हंगाम सुरू होईपर्यंत द्राक्षबागा जगवायच्या कशा असा प्रश्न जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना पडला आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने तब्बल 40 टक्के द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा परिणामी नाशिकच्या अर्थकारणाचा कणा मोडणारा आहे.
लांबलेला परतीचा व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात द्राक्षाचे 32 हजार 258 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. हे प्रमाण एकूण द्राक्ष पिकाच्या 55 टक्के आहे. मागील वर्षीच्या निर्यातीच्या आकड्यांचा विचार केल्यास नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांच्या नुकसानीचा निर्यातीवर काहीसा परिणाम होणार आहे.स्थानिक विक्रीला असणार्‍या द्राक्षांना मोठा फटका बसला असून या द्राक्षांचे सुमारे 40 टक्के नुकसान झाले आहे.
देशात नाशिक प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्हा आहे. देशातील एकूण द्राक्ष उत्पादनाच्या 80 टक्के व निर्यातीच्या 91 टक्के वाटा नाशिकचा आहे. जिल्ह्यातील नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड व बागलाण तालुक्यात प्रामुख्याने द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाचा खरिप पिकांसह कांद्यालाही मोठा फटका बसला. नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागांचे क्षेत्र मोठे असून, सलग 15 दिवस चाललेल्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. ऑक्टोबर छाटणीनंतर बहुसंख्य बागांना घड लागण्यास सुरुवात झाली होती.मात्र, या पावसामुळे डावणी व घडकुज होऊन संपूर्ण बागेतील द्राक्षघड कुजून गेले आहेत. जिल्ह्यात 58 हजार 367 हेक्टरवर द्राक्षबागा असून, त्यातील 32 हजार 258 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांना या पावसाचा फटका बसल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.जिल्ह्यातून मागील वर्षी सव्वादोन लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात होऊन जवळपास 2200 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होेते. ही निर्यात दरवर्षी वाढत असते.यावर्षी 55 टक्के क्षेत्र बाधित झाल्याने तेवढ्याच प्रमाणात निर्यात घटणार असा ढोबळ अंदाज केला तरी तब्बल पावणेबाराशे कोटी रुपयांचा देशाच्या परकीय गंगाजळीला व जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना फटका बसण्याचा अंदाज आहे.
बदलत्या हवामानाचा फटका गत दोन वर्षांपासून द्राक्षाला बसत असून 40 टक्के द्राक्ष बागा या फेल जात आहे. या बागा फेल गेल्या तरी त्याचा निर्यातीवर फारसा फरक पडलेला नाही.जिल्ह्यात द्राक्षाचे सुमारे दीड लाख एकर क्षेत्र आहे.यापैकी पंधरा ते वीस मेट्रिकं टन इतके उत्पादन होते.त्यातून दोन ते अडीच लाख मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात होते. ती याहीवर्षी होणारच आहे. कारण दोन ते अडीच लाख मेट्रिक टन उत्पादन होत असले तरी त्यातून निर्यातक्षम द्राक्षांचे प्रमाणे दहा टक्केच असते.त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षावर एवढा फरक पडणार नसून स्थानिक विक्रीला असणार्‍या द्राक्षांला मोठा फटका बसणार आहे.स्थानिक विक्री होणार्‍या द्राक्षांचे सुमारे 40 टक्के नुकसान झाले आहे.परतीच्या पावसामुळे घडकुज मोठ्या प्रमाणात झाली असून पोंंग्यामध्ये पाणी गेल्याने हे प्रमाण अधिक वाढले आहे.जे द्राक्ष काढायचे होते त्यातील द्राक्षमणी हे फुटले आहेत.जेथे घडकुज झाली आहे तेथे पोंग्यामध्ये पाणी गेल्यामुळे नुकसानीचे प्रमाण अधिक वाढले आहे.द्राक्षासाठी एकरी दोन ते अडीच लाख रुपये एकरी खर्च येतो. मात्र,परतीच्या पावसामुळे सतत औषध फवारणी करावी लागत असल्याने दोन ते अडीच लाखांपर्यंत खर्च आजच संपला आहे. त्यामुळे उत्पादनासाठी लागणारा खर्च द्राक्ष येण्यापूर्वीच संपला असून आता द्राक्ष पीक येईपर्यंत म्हणजेच पुढील हंगामापर्यंत वाट पहावी लागणार आहे.मात्र,तत्पूर्वीच उत्पादनासाठी लागणारा खर्च झाल्यामुळे पुढील हंगामापर्यंत पैशांची उपलब्धता करायची कशी असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे,असे राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे खजिनदार कैलास भोसले यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!