Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २५ गृह स्थानबध्द, ७ जणांचा शोध...

नाशिक जिल्ह्यात मरकज निजामुद्दीनचे ३२ जण; २५ गृह स्थानबध्द, ७ जणांचा शोध सुरु

file photo

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

दिल्ली येथे निजामुद्दीन तबलीक समाजाच्या मरकज मध्ये जिल्ह्यातील ३२ जणांचा सहभाग उघडकीस आला आहे. यातील २५ जणांना गृह स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर अद्यापही सात जणांचा शोध सुरु आहे. ३२ जणांमध्ये शहरातील २१ तर ग्रामिण भागातील ११ जणांचा सामावेश आहे.

दिल्ली येथे काही दिवसांपुर्वी निजामुद्दीन तबलीक समाजाच्या मरकज हा धार्मिक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तिंना करोनाची लागन झाल्याचे समोर आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हातुन ३२ जण गेले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शहरातील २१ व ग्रामिण भागतील ११ जणांचा सामावेश होता. ग्रामिण भागातील मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड येथील हे लोक आहेत.

शहरातील २१जणांपैकी ७ जण हे परजिल्हा व परराज्यातच असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील तिघे दि्ल्लीत, एक पुण्यात, एक मुंबईत, एक हरियाणात तर एक उत्तरप्रदेशात आहे.

दरम्यान, उर्वरित १४ जणांचाही पोलिस व आरोग्य यंत्रणेने शोध घेतला आहे. यातील ७ जण हे हिंदू धर्मिय तर ७ जण मुस्लिम आहेत. यातील एक युवती ही शिक्षणानिमित्ताने गुडगाव येथे असते.

ती शहरात आली आहे. १२ते १९ मार्चदरम्यान नाशिकमध्ये आलेले उर्वरित १३ जणांचीही आरोग्य यंत्रणेने तपासणी केली असून, त्यांना तपोवनातील महापालिकेच्या रुग्णालयात स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. यातील काही जण हे व्यावसायिक असून, त्याच निमित्ताने दिल्लीला गेले होते. तर तबलिगी जमात कार्यक्रमात केवळ तिघेच सामील झाल्याचे तपासातून समोर येते आहे.

सध्या साऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही संशयित लक्षणे नाहीत. अशी माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

ग्रामिणमधील सर्व गृहस्थानबध्द

मरकज साठी ग्रामिण भागातील ११ जण गेले होते. यातील सर्वांचाशोध घेण्यात आला आहे. १० जणांना गृहस्थानबद्ध करण्यात आले आहे. तर एकजण अद्याप दिल्ली येथे आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.

– डाँ. आरती सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या