Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळा : अज्ञात आजाराने ३२ मेंढ्यांचा मृत्यू

Share
लोहोणेर | (वार्ताहर)
देवळा तालुक्यातील खालप अज्ञात आजाराने ३२ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. आणखी १८ पेक्षा अधिक मेंढ्यांना अत्यवस्थ असून मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान या घटनेत झाले आहे.  शासनाकडून या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भरपाई मिळावी अशी मागणी मेंढपाळ वर्गातून केली जात आहे.
अधिक माहिती अशी की, बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील संजय झाडे व अभिमन झाडे यांच्या मालकीच्या  १५० मेंढ्या असून देवळा तालुक्यात खालप शिवारात त्यांचे वाडे बसत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून या मेंढ्यांवर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने चालत्या – फिरत्या मेंढ्या माना टाकून मरण पावत आहेत. आतापर्यंत ३२ मेंढ्या या रोगाची शिकार झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
अजूनही जवळपास २० ते २५ मेंढ्यांना हा त्रास जाणवत असल्याचे दिसून आले आहे.  पशुवैद्यकिय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मेंढ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. परंतु,  मेंढ्या उपचारास प्रतिसाद देत नसल्याचे भाऊसाहेब वाणले यांनी सांगितले आहे.
दुष्काळी स्थिती असून अद्याप पाहिजे इतका पाऊस न झाल्याने चारा व पाण्याची वानवाच आहे. त्यात असे नुकसान झाल्याने झाडे कुटुंबीय निराशेच्या गर्तेत सापडले आहे. या मृत मेंढ्यांचा तातडीने पंचनामा करून या मेंढपाळांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!