१९१ कोटीची वसूली करत नाशिक विभागात अव्वल; महसूलात ३२ कोटी अधिक वसुली

१९१ कोटीची वसूली करत नाशिक विभागात अव्वल; महसूलात ३२ कोटी अधिक वसुली

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा प्रशासन करोना संकटाशी दोन हात करत असून वर्षभरात लोकसभा व विधानसभा निवडणुका, अतिवृष्टी, अवकाळी या संकटात मदतकार्यात यंत्रणा व्यस्त होती. तरी देखील महसूल विभागाने दिलेल्या उदिष्टापैकी जादा महसूल करत विभागात अव्वल प्रथम क्रमांक मिळवला आहे.

१७१ कोटी ३४ लाख ८० हजारांचे उदिष्ट होते. प्रशासनाने ११९ टक्के इतकी वसूली केली.विभागात पाचही जिल्ह्यांनी १०० टक्के महसूल वसूल करत जवळपास ५४० कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला.

२०१९ – २० हे आर्थिक वर्ष जिल्हा प्रशासनापुढे विविध संकट व आव्हाने घेऊन आले. गत वर्षी एप्रिल मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीत महसूल यंत्रणा व्यस्त झाली.

त्यानंतर अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूर नियोजनात आणि नुकसान झालेल्या कुटुंबाना मदत देण्यसाठी यंत्रणा व्यस्त झाली. त्यानंतर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. तब्बल ६ लाख ३६ हजार हेक्टवरील म्हणजे पेरणी झालेल्या आणि लागवड झालेल्या तब्बल ७० ते ८० टक्के क्षेत्रावरील पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे पंचनामे करण्यास प्राधान्य देण्यात आले.

सोबतच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने नियोजनाचा अख्खा भार प्रशासकीय यंत्रणेवर येऊन पडला. पण नववर्षात २०२० पासून महसुल वसूलीवर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केल्यामुळे काही तालुक्यांचा वसूलीचा टक्का वाढला. राज्य शासनान यंदा नाशिक जिल्हाप्रशासनाला मार्च २०१९ ते मार्च २०२० या आर्थिक वर्षात १७१ कोटी ३४ लाख २५ हजार रुपयांच्या महसूलाचे उद्दीष्ट दिले होते.

त्यात फेब्रुवारी अखेर १४० कोटी ७५ लाख ३८ हजारांची वसुली झाली होती. त्यामुळे उर्वरित वसूलीसाठी दिवस कमी असतांना प्रशासनाने महसूल वसूलीसाठी कंबर कसली. त्यामुळे ३१ मार्च अखेर शासनाने दिलेले उदीष्ट साध्य करत त्यापेक्षा अधिक रक्कम वसूल केली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने १०४ टक्के, नंदूरबार १०८,जळगाव १००,अहमदनगर १०६ टक्के असे एकूण १०८ टक्के वसुली

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com