Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

३१ वर्षीय युवकाची दुचाकीसह शितकड्यात उडी; सप्तशृंगी गडावरील घटनेने खळबळ

Share

सप्तशृंगीगड | वार्ताहर

कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर युवकाने दुचाकीसह शितखड्यावरून उडी घेतल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून युवकाचा मृतदेहदेखील छिन्नविच्छिन्न अवस्थेत मिळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नांदुरी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. घटनास्थळी अभोणा पोलीस निरीक्षक पथकासह दाखल झाल्यानंतर त्यांनी पाहणी केली. दरम्यान,  मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

सदर युवकाचे नाव प्रशांत जयवंतराव मोरे (वय ३१) असे आहे. हा युवक औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण रोड परिसरातील असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एमएच २० सीएम ५०८६ क्रमांकाच्या दुचाकीची नंबरप्लेट मिळून आली.

घटनेची माहिती स्थानिकांकडून आज सकाळी नांदुरी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी कळवण तालुका पोलीस ठाण्याचे अभोणा पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड,पोलीस एस आय खाडे,योगेश गवळी, शिवा शिंदे, किशोरे दाखल झाले.

त्यांनी मृतदेहाची तपासणी करताच आधार कार्ड व मोबाईल आढळून आले. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी औरंगाबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधून व्यक्तीचे नाव आणि इतर माहिती देऊन चौकशी केली.

काही दिवसांपूर्वी  प्रशांत मोरे  बेपत्ता असल्याची नोंद त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रशांत याने आत्महत्या केली की, त्याचा घातपात करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती त्याचे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!