Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गंगापूरमधून विसर्ग वाढवला; दुतोंड्या मारुती बुडाला; गाडगे महाराज पुलाला पाणी लागले

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात जोर धरलेल्या पावसाची संततधार रात्रीपासून अधिकच वाढली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून विसर्ग केला जात आहे. आज सकाळच्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणातून २० हजार ०४३ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तर होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग ३० हजार क्युसेकपेक्षा अधिक असून धोक्याची पातळी गोदावरीने कालच ओलांडली आहे.

नुक्त्याच्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार गोदावरी नदीच्या पुराचे परिमाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुती कालच पूर्णपणे बुडाला होता. तर, नारोशंकर मंदिराच्या घंटेला पाणी लागले तर गोदावरीला महापूर येतो असे म्हटले जाते.

नारोशंकराच्या घंटेला पाणी अद्याप लागले नसले तरी नारोशंकर मंदिर अर्धे पाण्याखाली गेले आहे. घंटा अजूनही दिसून येत आहे. तर तिकडे गाडगे महाराज पुलाच्या खाली पाणी लागल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली असून याठिकाणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ठिकठिकाणी गर्दी करणाऱ्या नाशिककरांना सावधानतेचा इशारा देत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!