वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यु; सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

0
सुरगाणा |  तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या रानविहीर येथील शेतमजुरी करणाऱ्या रुग्णाकडे सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेजीव गमवला लागला असल्याचा आरोप मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

तालुक्यातील खुंटविहीर जवळील रानविहीर या दुर्गम पाड्यावरील राजू काशिराम गावित (वय 30) या शेतमजूरास दहा वाजेच्या सुमारास दम्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यानं उपचारासाठी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, प्राथमिक उपचार करून रुग्ण बरा असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल करून न घेताच घरी पाठवून दिले. गाव तीस किलोमीटर अंतरावर जंगल भागात असल्याने त्यांनी सुरगाणा गावानजीकच्या दीड ते दोन कि.मी.अंतरावरील वडपाडा या पाड्यावर रात्र काढली.

रात्री पुन्हा दोन वाजेच्या सुमारास छातीत कळा आल्याने रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डी.जी. कांबळे हे कर्तव्य बजावत होते. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे 108 वरील वैद्यकीय अधिकारी संजय नागरे यांनी सांगितले की तुमचा रुग्ण येथेच बरा होणार आहे.

त्यामुळे नाशिकला हलविण्याची गरज नाही असे नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नाशिक येथे रुग्णास नेण्याची तयारी केली. त्यासाठी 108 रुग्णवाहिका फोन करून बोलावण्यात आली. मात्र रुग्ण गंभीर असतांना पाठवू दिले नाही.

यामागचे कारण असे की सुरगाणा येथे आठवडे बाजार असल्याने नागरे हे खाजगी दवाखाना चालवून उपचार करत असल्याने बाजाराच्या दिवशी रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे त्यांनी नाशिकला जाण्यास नकार दिला. त्यांच्या या आडमुठेपणामुळे राजू गावित याचा बळी गेला असल्याचा आरोप नातेवाईक सावळीराम गांगुर्डे, भागीबाई भोये, काशिराम गावित यांनी दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांच्यावर केला आहे.

सुरगाणा येथील वैद्यकीय अधिका-याचे पद रिक्त असतांना डॉ. डी.जी. कांबळे यांनी आठवड्यातील चार दिवस जिल्हा ग्रामीण रुग्णालयात काम करण्यासाठी प्रतिनियुक्ती करून घेतली आहे. सध्या बा-हे येथील वैद्यकीय अधिकारी हे तात्पुरते काम करीत आहेत. असे असतांना प्रतिनियुक्तीचा खटाटोप कशासाठी असा प्रश्न विचारला जातो आहे. त्याच प्रमाणे रुग्णालयात औषधसाठा संपला असून खाजगी मेडिकल मधून औषधे विकत आणावी लागतात.

LEAVE A REPLY

*