राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषित

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई, दि. २: कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे. या रुग्णालयामुळे २ हजार ३०५ खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना  केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असेल.

जिल्हा आणि अधिसूचित रुग्णालयाचे नावे, कंसात खाटांची संख्या:

ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (१००), मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००), वाशी- सामान्य रुग्णालय (१२०), कल्याण-डोंबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (१००), रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००), नाशिक- कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (१००) (७०), अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (१००), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०), धुळे- जिल्हा रुग्णालय शहारातील इमारत (५०), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०), सातारा- सामान्य रुग्णालय (६०), सिंधुदुर्ग- नवीन इमारत एएमपी फंडेड (७५), रत्नागिरी- सामान्य रुग्णालय  व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (१००) (५०), औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नवीन इमारत (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत (५०), नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०). अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नवीन इमारत (१००),वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०), बुलढाणा-स्त्री रुग्णालय नवीन इमारत (१००), वर्धा- सामान्य रुग्णालय (५०), भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नवीन इमारत (८०) आणि गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००) या सर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा मिळून २ हजार ३०५ खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध होतील.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *