Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

चिंचखेडला आगीत गहू जळून खाक; बळीराजा संकटात

Share

चिंचखेड | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील रहिवासी लता अविनाश निकम यांच्या गट क्रमांक 262 ड मधील तीस आर (दीड बिगा) गहू जळून खाक झाला.

रविवारी अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे निकम यांच्या शेताच्या कोपऱ्यावर असलेल्या विद्युत रोहित्रवर विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन मोठ्या प्रमाणात आगीच्या ठिणग्या शेतातील सोंगनीला आलेल्या गव्हाच्या पिकावर पडल्या.

कोरड्या झालेल्या पिकाने क्षणार्धात पेट घेत क्षणार्धात होतेचे नव्हते केले. नोव्हेंबरपासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले उभे पिक डोळ्यासमोर खाक झाल्याने बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या जाळ्यात अडकला आहे.

ही घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्याने वेळेवर मदत उपलब्ध होऊ शकली नाही. निकम कुटुंबीय शेतीच्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करतात.

त्यामुळे शासनाकडून पिकाच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!