#2point0 : VIDEO : रजनीकांत आणि अक्षयकुमार ‘2.0’च्या प्रमोशनसाठी करणार ‘वर्ल्ड टूर’

0

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा चित्रपट ‘२.०’विषयी एक मोठी बातमी समोर येत आहे.

रजनीकांत आणि अक्षय त्यांच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक वेगळा फॉर्म्युला वापरणार आहेत.

या चित्रपटाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी रजनी आणि अक्षय वर्ल्ड टूर जाणार आहेत. होय, हे खरं आहे. चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी सध्या या दोघांकडूनही विशेष प्लॅनिंग केले जात असून, त्यानुसार वर्ल्ड टूरचे नियोजन केले जात आहे. सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे.

चित्रपटाचे प्रोड्यूसर राजू महालिंगम यांनी त्यांच्या सोशल साइटवर एक व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘2.0 promotion kick starts……#2point0’ असे लिहिले आहे.

हा चित्रपट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज केला जाणार होता. परंतु आता चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून, २५ जानेवारी २०१८ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

प्रेक्षकांना माहिती देताना प्रॉडक्शन राजू महालिंगमने सांगितले की, रजनीकांत आणि अक्षय यांच्या ‘२.०’ या चित्रपटाच्या व्हीएफएक्स टेक्नॉलॉजीवर आम्ही विश्वस्तरीय काम करीत आहोत. ज्याकरिता बराचसा वेळ लागण्याची शक्यता आहे.

आम्ही प्रयत्नशील होतो की, हा चित्रपट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज केला जावा, परंतु ते मुश्किल वाटू लागल्यानेच आम्ही रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

सध्या आमची सर्व टीम व्हीजुअल इफेक्ट्सवर मोठ्या प्रमाणात काम करीत आहे.

त्यामुळे हा चित्रपट जगभरात रिलीज करता यावा म्हणूनच २५ जानेवारी २०१८ हा दिवस निवडला आहे.

LEAVE A REPLY

*