Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात आज नव्याने २९ रूग्ण पॉझिटिव्ह; करोना बळींची संख्या पोहोचली ७५...

नाशिक जिल्ह्यात आज नव्याने २९ रूग्ण पॉझिटिव्ह; करोना बळींची संख्या पोहोचली ७५ वर

नाशिक । प्रतिनिधी

मालेगावपाठोपाठ नाशिक शहरात  करोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. आज जिल्ह्याभरात नव्याने २९ रूग्णांची भर पडली. यात  एकट्या नाशिक शहरातील २१ व ग्रामिण भागातील ८ रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या १२८९  वर पोहचली आहे. तर रात्रीपासून आतापर्यंत 5 रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोना बळींची संख्या 75 झाली आहे.

- Advertisement -

आज दिवसभरात  जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये नाशिक शहरातील ८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.यात नाशिक शहरातील वडाळा २, कामठवाडा १,  गंगापुररोड १, शिवसमर्थनगर १, रोहणीनगर पेठरोड १, खासगी रुग्णालय २, समता नगर, सातपूर डॉ. आंबेडकर मार्केट, इच्छामणी नगर, दोंदे मळा, पेठ रोड, गोसावी वाडी, एमएचबी हॉस्पिटल आणि वीर सावरकर चौक सिडकोतील  रुग्णांचा समावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा २५० वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील आज  ८ रूग्ण आढळून आले आहेत. ते सिन्नर 1, सोनवडी1,  नांदगाव 1, अबोदे 1, ईगतपुरी 3,  मालेगाव तालुक्यातील 1 येथील  आहेत.  यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा १९७  झाला आहे. तर मालेगाव शहरातील आज एकही रूग्ण न आढळल्याने काहीसा दिलासा प्रशासनास मिळाला आहे.

यामुळे मालेगाव येथील रूग्णांचा आकडा 782 वर  स्थीर आहेे.   जिल्ह्यात आज दोघांचा मृत्यू झाला असल्याने एकुण मृत्यू झालेल्यांचा आकडा 75 झाला आहे. तसेच  जिल्ह्यात आज 24 रुग्ण करोना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे करोनामुक्त  होणारांचा आकडा 872  वर पोहचला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत   12 हजार 470 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 10 हजार 635 निगेटिव्ह आले आहेत, 1276 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 329 रूग्ण  उपचार घेत आहेत. तर अद्याप 569 अहवाल प्रलबिंत आहेत.

अहवाल प्रलंबित राहण्याच्या प्रमाण वाढले असल्याने    चिंता व्यक्त होत आहे. यामुळे मागील काही दिवसांचे अहवाल एकत्र आल्यानंतर एकदम करोनाग्रस्तांचा आकडा वढलेला दिसतो असे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान आज नव्याने 53 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील 29, जिल्हा रूग्णालय 5, मालेगाव 8 संशयित रूग्णांचा सामावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार 

* एकूण कोरोना बाधित: १२८९
* मालेगाव : ७८२
* नाशिक : २५०
* उर्वरित जिल्हा : १९७
* जिल्हा बाह्य ः ६०
*  एकूण मृत्यू: ७५
* कोरोनमुक्त : ८७२

बिडीकामगार नगर मधील एकाचा मृत्यू

बिडीकामगारनगर या वसाहतीतील 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण  30 मे रोजी खाजगी रुग्णालयात छातीत दुखणे, खोकला, श्वास घेण्यास त्रास यामुळे दाखल केल्याने त्यांचे स्वॅब घेतले.रविवारी (ता. 31) रात्री त्याचा अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने रात्री उशिरा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. त्यांना मधुमेह, रक्तदाबाचाही विकार होता. त्यांची मंगळवारी (ता.2) पहाटे प्रकृती खालावल्याने कोरोनामुळे मृत्यु झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या