Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नैताळेत २७ वर्षीय युवकाचा खून

Share
लासलगाव | वार्ताहर
निफाड तालुक्यातील नैताळे येथील २७ वर्षीय युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल दत्तु पवार (वय 27) असे या युवकाचे नाव आहे. युवकाचा खून करून पालखेड डावा कालव्यात फेकुन दिला होता. म॔गळवारी रात्री विंचुर येथील प्रतापसागर जलाशयाजवळ मृतदेह मिळून आल्याने घटना उघडकीस आली. याप्रकणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लासलगाव पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता सदर मृतदेह निफाड तालुक्यातील नैताळे येथील अनिल दत्तु पवार (वय 27 रा. घायाळ गल्ली ,गाजरवाडी)  याचा असल्याचे समोर आले.
घटनास्थळी तपासाबाबत अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, निफाड पोलीस उपअधीक्षक  माधव रेडडी  यांनी भेट दिली. मृत इसमाचा भाऊ कृष्णा दत्तु पवार यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार लासलगाव पोलिस कार्यालयात अज्ञात इसमा विरुद्ध भादंवी कलम 302,201 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक तपास लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर.एस.सोनवणे करीत आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!