Friday, April 26, 2024
Homeनाशिकनऊ महिन्याच्या चिमुकलीसह ५ अल्पवयीन बाधित; मालेगावी रुग्णसंख्या ३२५ वर; आज २७...

नऊ महिन्याच्या चिमुकलीसह ५ अल्पवयीन बाधित; मालेगावी रुग्णसंख्या ३२५ वर; आज २७ पाॅझिटिव्ह

मालेगाव | प्रतिनिधी

मालेगाव येथील आज १२८ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३७ अहवाल बाधित आढळून आले आहेत. मागील पॉझिटिव्ह १० रुग्णांचे अहवाल बाधित आढळले आहेत. आज नवीन २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने मालेगावमधील रुग्णसंख्या ३२५ वर पोहोचली आहे. तर आज ९१ अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisement -

शहरात करोना रुग्णांची संख्या थांबण्याची थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने जनतेची चिंता वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत मालेगावमध्ये ६८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

मालेगावमध्ये बाधित रुग्णांची संख्या आता ३२५ वर जाऊन पोहचली आहे. तर जिल्ह्यात एकूण जिल्ह्याची संख्या ३६० वर पोहोचली आहे. करोना बाधीत पोलिसांचा आकडा ५९ वर पोहोचला आहे. एकट्या

तर सर्वात धक्कादायक म्हणजे सोयगाव पाठोपाठ ग्रामीण भागात दाभाडी गावात देखील करोणाचा झालेल्या प्रवेशाने जनतेबरोबर प्रशासन यंत्रणेच्या चिंतेत भर घातली आहे.

पाच वर्षीय मुलगी मालेगाव कॅम्प परिसरात आढळून आली आहे. तर नूरबागमध्ये आज आठ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये  ८ आणि १७ वर्षीय अल्पवयीनांचा समावेश आहे.

आदर्शनगर मध्ये ३१ वर्षीय रुग्ण बाधित आढळून आला आहे.  जामेर रोड परिसरात ५५ वर्षीय व्यक्तीला करोना झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. सोयगावमधील पुंडलिक नगर येथे ४५ वर्षीय प्रौढाचा समावेश आहे. ३० व्यक्तीचा सर सय्यद नगर परिसरातील नागरिकाचा समावेश आहे.

२४ वर्षीय तरुण इस्लामपुरा परिसरातील आहे. १४ व १८ वर्षीय मुलगे हजार खोली बागबान गल्लीतील असलायचे समजते. तर नऊ महिन्यांची मुलगी प्रकाश हौसिंग सोसायटीतील असलायचे कळते.

४४ वर्षीय पाटकिनारा संगमेश्वर येथील असलायचे समजते आहे. दुसरीकडे सटाणा नाका परिसरातील ४५ वर्षीय नागरिकाला लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जगताप गल्लीतील ३० आणि ५० वर्षीय नागरिकाचा अहवाल बाधित आला आहे.

हिम्मतनगर मध्येही दोघांचा अहवाल बाधित आला आहे. आयशा नगरमध्ये ४८ वर्षीय व्यक्ती करोनाने बाधित आढळून आल्याचे समजते आहे.

आज दोन पोलिसांना मालेगावी करोनाची लागण झाली आहे. यातील एक राज्य राखीव दलाचा जवान असून दुसरा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी असलायचे समजते. तर पवार गल्लीतील एका २२ वर्षीय तरुणाला करोनाची बाधा झाली आहे.

शहरात बाधित रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना 13 रुग्ण करोना पासून मुक्त झाल्याने त्यांना मोठ्या उत्साहात सत्कार करत आरोग्य यंत्रणेतर्फे घरी पाठवण्यात आले.  मालेगावात एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या आता २० वर पोहोचली आहे.

निगेटिव रुग्णांची वाढती संख्या उत्साह वाढविणारी असली तरी प्रत्येक अहवालात निष्पन्न होत असलेले बाधित रुग्ण शहराला करोना ने घट्ट विळखा घातल्याचे दर्शवित असल्याने जनतेत काळजीचा सूर उमटत आहे.

मालेगाव शहरातील बहुतांश परिसर प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट झाला आहे. विशेष म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रातून देखील बाधित रुग्ण अद्याप आढळून येत असल्यामुळे संपर्काची साकळी तुटत नसल्याने चिंता व्यक्त केली  जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या