Type to search

क्रीडा

27 वर्षांनी इंग्लंड फायनलमध्ये

Share

बर्मिंगहॅम । ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 224 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 32.1 षटकात 8 गडी राखून एकतर्फा विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात धडक मारली आहे.

इंग्लंडने सुरूवातीलाच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात 124 धावांची भागीदरी झाली. जॉनी बेयस्टो 43 चेंंडूत 34 धावांवर बाद झाला. त्यानंतर जेसन रॉयने 65 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह 85 धावांची तुफान फटकेबाजी केली. अंपायर कुमार धर्मसेनाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका जेसन रॉयला बसला. जो रूटने 46 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या तर कर्णधार इयन मॉर्गनने 39 चेंडूत नाबाद 45 धावा करून संघाला दणदणीत विजय मिलवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सला प्रत्येकी 1 गडी बाद केला.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजजी करताना 49 षटकात सर्वबाद 223 धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने 85 धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (46) आणि मिचेल स्टार्क (29) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक मार्‍यापुढे ऑस्ट्रेलियाला 223 धावांवर समाधान मानावे लागले. स्टीव्ह स्मिथ याने एकाकी झुंज दिली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला द्विशतकी मजल मारता आली. 47 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्मिथ 85 धावांवर खेळत होता. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नात तो बाद झाला. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार फिंच शून्यावर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. डेव्हिड वॉर्नर 2 चौकार लगावून 9 धावांवर बाद झाला. नवखा पीटर हँड्सकॉम्ब 12 चेंडूत 4 धावा काढून माघारी परतला. वोक्सने त्याला त्रिफळाचित केले. 14 धावांवर 3 गडी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी सावरले. या दोघांनी अत्यंत सावध खेळी करत 14 व्या षटकात संघाला पन्नाशी गाठून दिली. स्मिथच्या साथीने अलेक्स कॅरीने चांगली भागीदारी केली. पण अर्धशतकाच्या जवळ पोहोचल्यावर कॅरी झेलबाद झाला. 70 चेंडूत 4 चौकारांसह 46 धावा केल्या. कॅरी पाठोपाठ मार्कस स्टॉयनीस आदिल रशिदच्या फिरकीचा शिकार ठरला. 2 चेंडूत तो शून्यावर पायचीत झाला. ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडत असताना स्टीव्ह स्मिथने झुंजार खेळी करत 72 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. फटकेबाज खेळी करण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल झेलबाद झाला. 2 चौकार आणि 1 षटकार खेचत 23 चेंडूत 22 धावांवर तो माघारी परतला. अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स स्वस्तात माघारी परतला. त्याने 10 चेंडूत 6 धावा केल्या. मिचेल स्टार्कदेखील 29 धावा काढून माघारी परतला.

इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि आदिल रशिदने 3-3 तर जोफ्रा आर्चरने 2 आणि मार्क वूडने 1 गडी बाद केला.त्यानंतर हा सामना आस्ट्रेलियाच्या हातून निसटला 27 वर्षांनंतर इंग्लंडने फायनलमध्ये प्रवेश करीत आपल्या चहात्यांना सुखद धक्का दिला.

धावफलक :
ऑस्ट्रेलिया : 223/10 (49 षटके)
फलंदाज : डेव्हीड वॉर्नर (9), अ‍ॅरॉन पिंच (0), स्टीव्ह स्मिथ (85), पीटर हँड्सकोब (4), अ‍ॅलेक्स कॅरी (46), मार्क्स स्टोयनिस (0), ग्लेन मॅक्सवेल (22), पॅट कमिन्स (6), मिशेल स्टार्क (29), जेसन बेहरनडॉर्फ (1), नेथन लियॉन (5*), अतिरिक्त : 16 गोलंदाज : ख्रिस वोक्स (8-0-20-3), जोफ्रा आर्चर (10-0-32-2), बेन स्टॉक्स (4-0-22-0), मार्क वुड (9-0-45-1), लियाम प्लंकेट (8-0-44-0), आदिल रशीद (10-0-54-3)

इंग्लंड : 226/2 (32.1 षटके)
फलंदाज : जेसन रॉय (85), जॉनी बेअरस्ट्रो (34), जो रुट (49*), इऑन मॉर्गन (45*), अतिरिक्त : 13 गोलंदाज : जेसन बेहरनडॉर्फ (8.1-2-38-0), मिशेल स्टार्क (9-0-70-1), पॅट कमिन्स (7-0-34-1), नेथन लियॉन (5-0-49-0), स्टीव्ह स्मिथ (1-0-21-0), मार्कस स्टोयनिस (2-0-13-0).

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!