Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

आदिवासी विकास महामंडळाकडून 26 लाख क्विंटल धान खरेदी; मार्च अखेर पर्यंत चालणार यंदाचा हंगाम

Share
आदिवासी विकास महामंडळाकडून 26 लाख क्विंटल धान खरेदी; मार्च अखेर पर्यंत चालणार यंदाचा हंगाम

बोनसमुळे शेतकर्‍यांचा ओढा वाढला

नाशिक । प्रतिनिधी

केंद्र शासनाची आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगामात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चांगलीच पसंतीला उतरली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने या हंगामात विक्रमी 26 लाख 8480 क्विंटल धान खरेदी केली आहे. हंगामाचा अद्यापही एक महिना शिल्लक असल्याने यंदाच्या वर्षी राज्यात रेकॉर्ड ब्रेक धान खरेदी होण्याचे चिन्हे आहे.

आधारभूत खरेदी योजनेतर्गत ‘अ’ प्रतीच्या धानाला प्रतीक्विंटल 1815 रुपये हमीभाव मंजूर करण्यात आला आहे. सोबतच प्रथम पन्नास क्विंटल खरेदीला प्रती क्लिंटल पाचशे रूपये बोनस देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकर्‍यांचा महामंडळाकडे ओढा वाढल्याचे चित्र आहे. चांगला हमीभाव मिळाल्याने शेतकरी आदिवासी विविध कार्यकारी संस्थांकडे धान विक्रीसाठी येत आहे.

‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर महामंडळाने धान खरेदी केली असून एनइएम पोटर्लद्वारे नोंदणी करून हि खरेदी करण्यात आली आहे. महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाने सर्वाधिक साडे अकरा लाख क्विंटल धान खरेदी केली आहे. त्या खालोखाल गोंदिया प्रादेशिक कार्यालयाने सुमारे दहा लाख क्विंटल धान विकत घेतले आहे. नाशिक विभागात ५० हजार क्विंटल खरेदी करण्यात आली असून नंदूरबार आणि अमरावती प्रादेशिक कार्यालयात मात्र अद्याप खरेदी झालेली नाही.

दरम्यान, खरेदी केलेल्या धानचे राईसमिल मधून भरडच्या माध्यामातून तांदूळात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. आता पर्यंत खरेदी केल्या 26 लाख 8480 क्विंटल धानापैकी केवळ 7 लाख 79917 क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. अद्यापही 18 लाख 28562 क्विंटल धानाची भरडाई बाकी आहे. खरेदी सुरू असल्याने भरडाई कमी होत असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

350 कोटींचे वितरण

धान खरेदीपोटी संबंधीत उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 347.41 कोटी रूपये वर्ग करण्यात आले आहे. गडचिरोली (143.23 कोटी), गोंदिया (153.28 कोटी) नागपूर (2.33 कोटी), चंद्रपूर (15.98 कोटी), ठाणे (18.22 कोटी), रायगड (70 लाख), पालघर (11.34 कोटी), नाशिक (2.29 कोटी) असा मोबदला प्रादेशिक कार्यालयांनी वितरित केला आहे.

तर बोनस रक्कम वाटप करणे बाकी आहे. गडचिरोली- 11 लाख 43344 क्विंटल, गोंदिया- 9 लाख 89664 क्विंटल, नागपूर- 22327 क्विंटल, चंद्रपूर- 1 लाख 23341 क्विंटल, ठाणे- 1 लाख 50666 क्विंटल, रायगड- 4232 क्विंटल, पालघर- 1 लाख 25271 क्विंटल तर नाशिक- 49631 क्विंटल याप्रमाणे धानाची खरेदी करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!