Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

26 लाखांचा गुटखा जप्त ; मदयसाठा हस्तगत ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : यंत्रणा अलर्टवर

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गुजरातहून जिल्ह्यात येणारा 26 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. तसेच, दिव व दमण येथील मदयसाठा हस्तगत केला आहे. निवडणुकीत मतदारांना प्रलोभन म्हणून याचा वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आचारसंहिता जारी झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंग यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.27) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूका शांततेत व सुरळित पार पडाव्या यासाठी पोलिसांकडून सुरु असलेल्या ऑपरेशनची त्यांनी माहिती दिली. जिल्ह्यात 50 कुख्यांत गुंडाची दोन वर्षासाठी तडीपारी करण्यात आली आहे.

अनेक गुंडांवर ‘एमपीडीए’ कायदयानूसार कारवाई केली जात आहे. फरार आरोपींना पकडण्याची मोहीम सुरु आहे. निवडणुकीत मदय, पैसा व इतर प्रलोभनाचा वापर होऊ नये यासाठी चेक पोस्टवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. सोशल मीडियावरील प्रचारावर सायबर सेलची करडी नजर असल्याचे त्यांनी सांगितले.

शहर हद्दीत 116 तडीपार

शहर हद्दीत 116 जणांवर तडीपारीची तर 10 गुंडांवर ‘एमपीडीए’ची कारवाई केल्याची माहिती लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. 128 गुंडांविरुध्द अजामीनपात्र नोटीसा काढण्यात आल्या आहे. शहरातील 11 ठिकाणी अवैध मदय विक्रीवर छापे टाकण्यात आले. देशी कट्टे, काडतूसे व एक तलवार जप्त करण्यात आली आहे. संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे.

ड्रोनद्वारे मतदारसंघाची निगराणी

जिल्ह्यातील 15 मतदारसंघातील संवेदनशील ठिकाणी ड्रोनद्वारे निगराणी केली जाईल. शहरात अनेक मतदार हे दाट वस्तीचे व कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. त्या ठिकाणी निवडणूक काळात निगराणी ठेवणे काहिसे अवघड आहे. ते बघात यंदा संवेदनशील ठिकाणांची ड्रोनद्वारे निगराणी केली जाणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!