संविधानाप्रती स्फुलिंग चेतवा : देवकर २६/११ च्या शहिदांना भावपुर्ण श्रद्धांजली

0
नाशिक | दि. २६ प्रतिनिधी – बलिदान ही आपला देशाची अभिमानस्पद अशी परंपरा आहे. संविधानदिनी झालेला २६/११ चा हल्ला केवळ मुंबई किंवा देशावर नव्हता तर सव्वाशे कोटी जनतेच्या श्रीमंतीवर, आपल्या आस्मीतेवरचा हा हल्ला होता. या पुर्वीही असे हल्ले परतावून लावित आपण आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे. यामुळे युवापिढीने याकडे आंतर्मुख होऊन पाहण्याची तसेच संविधानाप्रती स्फुलिंग चेतवण्याची गरज आहे. असे प्रतिपादन देशदूतचे संचालक संपादक विश्‍वास देवकर यांनी येथे केले.

द्ववारका परिसरातील माणेकशानगर येथील पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामिण कौशल्य विकास योजनेंतर्गत कारडा कन्स्ट्रक्शन संचलित कारडा स्कीलींग सर्व्ह्सिेस या संस्थेत संविधान दिन व २६/११ तील शहिदांना श्रद्धांजलीपर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी देवकर व उपस्थितांच्या हस्ते शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कारडा स्क्लिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल अमर, उपाध्यक्षा अंजू अमर, प्रकल्प प्रमुख विजय भोसले, दिपाली मालपूरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थ्ति होते.

देवकर म्हणाले, देशाच्या सीमा आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सैन्यदल आणि पोलिस सज्ज आहेत. परंतु सजग नागरिक म्हणून आपणही काही कर्तव्ये जाणीवपूर्व पार पाडायला हवीत. येथील प्रशिक्षणार्थींनी स्वत:मधील कौशल्यांचा विकास करून त्याचा उपयोग विधायक कामांसाठी केला तरी ती देखील देशसेवाच आहे.

या प्रमाणे प्रत्येक युवक देशसेवेत आपला सहभाग नोंदवू शकतो. चांगला माणूस बनून युवकांनी राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन देवकर यांनी केले. मुंबई हल्लयातील शहिदांना दुर्गम भागातील युवकांनी संचलनाद्वारे श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी धनश्री पाटील, किरण पाटील, गणेश शेळके, सागर गायकवाड या प्रशिक्षणार्थींनी देशभक्तीपर गिते, कविता वाचन व वक्तृत्वाद्वारे आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले. सेक्युरिटी गार्ड, बीपीओ आणि हॉस्प्टिॅलिटी असिस्टंस या प्रशिक्षण वर्गांचे सुमारे पावणेदोनशे प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थि होते. भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

*