26 उमेदवारांची सुनावणीकडे पाठ

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- वेळेत निवडणूक खर्च सादर न करणार्‍या पंचायत समितीच्या 32 पैकी 26 जणांनी मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांनी बोलावलेल्या सुनावणीकडे पाठ फिरवली.संबंधितांची 24 मे रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे गेल्यानंतर निवडणूक खर्च दिलेल्या मुदतीत सादर न केल्याप्रकरणी 90 उमेदवारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.यामध्ये झेडपी 32 व पंचायत समिती निवडणूक लढविणार्‍या 58 पराभूत व माघार घेणार्‍या उमेदवारांचा समावेश आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये करण्यात आलेला खर्च मतमोजणी झाल्याच्या नंतर एक महिन्यांच्या आतमध्ये देणे सर्व उमेदवारांना बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 72 जागांसाठी 305 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
यामध्ये 273 जणांनी विहीत वेळेत खर्च सादर केला तर, 32 उमेदवारांनी खर्च सादर न करणेच पसंत केले. मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहणारे तालुकानिहाय जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची नावे (गट) -अकोले- संगमनेर-सूर्यभान गोरे (वडगाव पान), पुंजा मांढरे (आश्‍वी बद्रुक), किरण राऊत, गिरी रवींद्र, मच्छिंद्र राऊत (घुलेवाडी), कोपरगाव-पोपट येवले (सुरेगाव), राहाता- देवचंद सोनवणे (राहाता), श्रीरामपूर निरंक, राहुरी-अनिल जाधव (ब्राम्हणी), नेवासा- विजय गायकवाड, अशोक शेळके, हरिभाऊ शेळके (बेलपिंपळगाव), प्रशांत गोल्हार, महेंद्र नजन (भेंडा बुद्रुक), रंजना साळवे (भानसहिवरे), नगर- संगीता भगत (जेऊर), कैलास पगारे (नागरदेवळे), अविनाश कोतकर (निंबळक), पाथर्डी-निरंक, शेवगाव-सुलोचना भोसले (बोधेगाव), पारनेर- वैजंता दुधाडे (ढवळपुरी), रुपाली सोनावळे (कान्हुरपठार), प्रवीण भोर (टाकळी ढोकेश्‍वर), सुषमा शेळके(सुपा), श्रीगोंदा-योगेश खेंडके, कर्जत-दीपक गाडे (मिरजगाव), बापू कांबळे, विक्रम कांबळे (कुळधरण), जामखेड- राधा नवगिरे (खर्डा) आदी वेळेत खर्च सादर न केलेले उमेदवार सुनावणीला गैरहजर होते.यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन, महसुलच्या उपजिल्हाधिकारी साधना सावरकर, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार गणेश मरकड, संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, कर्जत तहसीलदार, एन.ए.कदम, श्री कांबळे आदी उपस्थित होते.

उद्या पंचायत समिती उमेदवारांची सुनावणी
16 रोजी जिल्हा परिषद व उद्या 18 रोजी पंचायत समिती निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांची जिल्हाधिकार्‍यांपुढे सुनावणी होणार आहे. झेडपी उमेदवारांप्रमाणे दांडी मारणार्‍यांची संख्या राहणार का? त्यांच्याप्रमाणे या उमेदवारांनी सुनावणीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

उपस्थित
उमेदवारांची नावे
रावसाहेब दळवी (देवठाण), भाऊसाहेब आवारी, रंभाजी फापाळे (कोतूळ), सविता लोंढे (चांदा), सुनीता रासने, विक्रम कांबळे (कुळधरण) आदी उमेदवार सुनावणीसाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*