अमरनाथला नाशिकचे 250 भाविक; सर्व भाविक सुरक्षित

यात्रा बुकिंगवर कोणताही परिणाम नाही

0
नाशिक । अनंतनाग जिल्हयातील बटेंगु भागात अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेहून परतणारया भाविकांच्या बसेसवर बेछुट गोळीबार केला यात सात भाविकांचा मृत्यु झाला. या हल्ल्याने यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिकमधून खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांमार्फत सुमारे अडीचशे भाविक अमरनाथकडे गेले असून सर्वच्या सर्व भाविक सुरक्षित असल्याचे ट्रॅव्हल्स कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ यात्रेसाठी जातात. यंदा 29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली असून सोमवारी गुजरातहून आलेली यात्रेकरूंची बस अनंतनाग जिल्हयातील बटेंगु येथे येताच दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला चढवला. दहशवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 8 यात्रेकरू ठार झाले.

तर 19 यात्रेकरू जखमी झाले. यामुळे यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकमधून श्रीराम यात्रा कंपनी आणि चौधरी यात्रा कंपनीमार्फत सुमारे अडीचशे भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. श्रीराम यात्राकंपनीव्दारे गेलेल्या भाविकांपैकी 100 भाविक अमृतसर येथे असून हे भाविक उद्या वैष्णोदेवीकडे रवाना होणार आहेत.

तर 15 भाविक बालटानमध्ये सुरक्षित असल्याचे संचालकांनी सांगितले. त्याचप्रमाणे चौधरी यात्रा कंपनीमार्फत यात्रेसाठी गेलेले 100 भाविक श्रीनगर येथे, 50 भाविक बालटानमध्ये तर 25 भाविक कटरामध्ये सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. हे सर्वच्या सर्व भाविक सुरक्षित असून यात्राही सुरू आहे त्यामूळे यात्रा मार्गावर कोणताही धोका नसल्याने यात्रेकरूंनी घाबरून जाण्याचे कारण नाही असेही कंपनीमार्फत सांगण्यात आले. या हल्ल्यामुळे यात्रा बुकिंगवर कोणताही परिणाम झाला नसून यात्रेकरूंकडून बुकिंगसाठी विचारणा होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*