25 टक्केअंतर्गत प्रवेशासाठी एक हजार विद्यार्थ्यांना लॉटरी

0

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित घटकांच्या पाल्यांना खासगी शिक्षण संस्थांच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी निघालेल्या दुसर्‍या सोडतीत सुमारे 1 हजार 63 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कन्या विद्यालयात आज 25 टक्केअंतर्गत प्रवेशाची दुसरी लॉटरी प्रक्रिया राबवली. त्यावेळी नोंदणीकृत बालकांचे पालक, प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. यावेळी लॉटरीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे कळवण्यात आले. तर 2 हजार 306 बालकांची नावे सोडतीत निघाली नाही. पालकांनी 5 एप्रिलपर्यंत नमूद खासगी शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण आहेर यांनी यावेळी केले.

पहिली फेरी झाली होती. त्यावेळी 458 शाळांपैकी सुमारे 393 शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यापैकी सुमारे 2 हजार 822 विद्यार्थ्यांचे प्रवेश नमूद शाळांमध्ये निश्चित झाले आहेत. तर आज सुमारे 167 शाळांमधील 25 टक्के जागांसाठी लॉटरी काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांची नावे लॉटरीत निघाली नाही त्यांच्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग तिसरी लॉटरी काढेल, असे शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

*