Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

रोजगार मेळाव्यात अकराशे जागांसाठी पाचशे उमेदवार; २४७ उमेदवारांची निवड

Share

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व युथ एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या नॅशनल सिनिअर कॉलेज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.19) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार उद्योजकता मेळावा झाला. यामध्ये 247 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.

यूथ एज्युकेशन अ‍ॅन्ड वेलफेअर सोसायटीचे नॅशनल सिनियर कॉलेज, सारडा सर्कल येथे सकाळी 9.30 ते दुपारी 3 वाजेदरम्यान हा मेळावा झाला. मेळाव्यासाठी विविध 12 नियोक्त्यांद्वारे 1011 रिक्तपदे भरली जाणार होती.

उद्घाटन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनील सैंदाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी युथ एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष हाजी नासिर पठाण, उपाध्यक्ष अलिम शेख, प्रा. जाहिद शेख, खजिनदार हबीब खान पठाण, सदस्य एजाज सैय्यद, सहायक संचालक संपत चाटे आणि प्राचार्य रंंजना महाजन उपस्थित होते. आभार संदीप गायकवाड यांनी मानले.

या मेळाव्यासाठी विविध 12 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून मुलाखती घेण्यात आल्या. 1011 रिक्तपदे उपलब्ध असताना फक्त 505 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यातील 247 उमेदवारांची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली.

मेळाव्याते स्वय ंरोजगारासाठी अर्थ सहाय्य करणार्‍या शासनाच्या विविध महामंडळाचे मार्गदर्शन स्टॉल्स लावण्यात आले होते. सुरुवातीलाच करिअर तज्ज्ञ मंगेश भणगे यांनी मुलाखतीचे तंत्र आणि यशस्वी मुलाखतीची तयारी कशी करावी याबाबत उपस्थित उमेदवारांना अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा.गणेश मुंगसे, प्रा. पाटील, प्रा. मिर्झा, प्रा. मुळे आणि इतर कर्मचारी यांनी महा विद्यालयाच्या वतीने तर कौशल्य विकास विभागाचे अधिकारी संदीप गायकवाड, शंकर जाधव, अख्तर तडवी, संजिवनी नाईकवाडे, अशोक चव्हाण आणि कर्मचारी बाळू जाधव, रमाकांत कमानकर, दर्शना धर्माधिकारी, प्रदिप गावीत, रावसाहेब गावित, कल्पना दवंगे, मीना म्हस्के, सागर भाबड, कैलास गायधनी, राजेश मोरे यांनीही विशेष परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!