Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘जलयुक्त शिवार’अंतर्गत 236 गावे वॉटर न्यूट्रल

‘जलयुक्त शिवार’अंतर्गत 236 गावे वॉटर न्यूट्रल

301 गावांची निवड : 5 हजार 246 कामे पूर्ण

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात गतवर्षी 301 गावांची निवड करुन पाच हजार 366 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या कामांमध्ये जिल्हा अग्रस्थानी असून 301 गावापैंकी 236 गावे शंभर टक्के वॉटर न्यूट्रल (जलपरीपूर्ण) झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या कामांच्या माध्यमातून 29 हजार 127 क्युबीक मीटर इतकी पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली आहे.

मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात दुष्काळाचा फेरा पहायला मिळत आहे. दुष्काळातून मुक्तता व टँकरमुक्त गावांसाठी शासनाने जलयुक्त शिवार ही महत्वकांधी योजना हाती घेतली. पावसाचे पाणी आडवणे व जलसंधारण करुन जमिनीची भूजल पातळी वाढवणे हा योजनेचा उद्देश होता. शासन स्तरावरुन जलयुक्तची कामांसाठी गावांची निवड केली जाते. योजनेअतंर्गत सन 2018 – 19 साठी जिल्ह्यात 301 गावांची निवड करण्यात आली. पाच हजार 366 गावांमध्ये ही कामे केली जाणार होती.

त्यासाठी जिल्ह्यासाठी 1 कोटी 54 लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. रोजगार हमी योजना, जिल्हा परिषद, कृषी विभाग, लघुसिंचन व जलसंधारण विभागामार्फत जलुक्तची पाच हजार 246 कामे पूर्ण करण्यात आली. त्यासाठी 1 कोटी 11 लाख रुपये इतका खर्च झाला.सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे, समतल चर खोदणे, जमीन सपाटीकरण आदी कामे करुन पावसाचे पाणी साठविण्यात आले. या योजनेअंतर्गत 301 पैकी 236 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत.

त्यामध्ये मालेगाव तालुक्यात सर्वाधिक 29 गावे जलपरीपूर्ण झाली आहेत. त्या खालोखाल सर्वाधिक गावे बागलाण तालुक्यात आहे. या योजनेमुळे 29 हजार 127 क्युबिक मीटर पाणीसाठा वाढला आहे. गतवर्षी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरेशा पावसा अभावी दुष्काळाची दाहकता जाणवली. त्यामुळे टँकरसंख्येत वाढ झाली होती. मात्र, यंदा जिल्ह्यात पावसाने शंभर टक्के सरासरी ओलांडली आहे. जलयुक्तच्या कामामुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणात पाणी साठवण झाली. ते बघता यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसवणार नाही.

शंभर टक्के जलपरीपूर्ण झालेली गावे

त्र्यंबकेश्वर – 19
इगतपुरी – 6
पेठ – 10
निफाड – 17
चांदवड – 26
सिन्नर – 22
येवला – 6
कळवण – 20
दिंडोरी – 15
सुरगाणा – 16
देवळा – 7
मालेगाव – 29
बागलाण – 28
नांदगाव – 15

- Advertisment -

ताज्या बातम्या