अहमदनगर : 23 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी 12 पोलीस निरीक्षक पाच सहायक पोलीस निरीक्षक व सहा पोलीस उपनिरीक्षक अशा 23 अधिकार्‍यांच्या पारदर्शी बदल्या केल्या आहेत. त्यात संगमनेर, तोफखाना, कोपरगाव, शिर्डी सुरक्षा/ बेलवंडी, शेवगाव, श्रीरामपूर व नगर शहर वाहतूक शाखा अशा महत्वाच्या ठिकाणी फेरबदल करण्यात आले आहेत. या बदल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांची बेलवंडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर तेथील ललित पांडुळे यांना श्रीरामपूर विभागाची वाहतूक शाखा देण्यात आली आहे. शहर वाहतुक शाखेतून वादग्रस्त ठरलेले प्रसाद गोकुळे यांना नियंत्रण कक्षेत बदली करण्यात आली होती. त्यांची संगमनेर विभागाच्या वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

पारनेर पोलीस ठाण्यातून वराळ हत्याकांडानंतर दिलीप परेकर यांना दहशतवाद विरोधी पथक देण्यात आले होते. बर्‍याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर त्यांना संगमनेर तालुका पोलीस ठाणे देण्यात आले आहे. तर तेथील गोकुळ औताडे यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्याची धुरा देण्यात आली आहे. शेवगाव पोलीस ठाण्यातील सुरेश सपकाळे यांनी त्यांचा कार्यकाल यशस्वीरित्या संपन्न केला आहे. त्यामुळे त्यांना तोफखाना पोलीस ठाणे देण्यात आले आहे. तर तेथील पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची पाथर्डी ते तोफखाना कर्यकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली होती. तसेच त्यांच्या काळात पोलीस ठाण्यात लाचलुचपतचे छापे पडले होते. त्यामुळे त्यांची थेट नियंत्रण कक्षेत बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी बहुतांश कार्यकाळ जिल्हा विशेष शाखेत काढला होता. त्यांची कार्यकीर्द कार्यक्षम ठरली आहे. त्यामुळे त्यांना कोपरगाव शहर पोलीस ठाणे देण्यात आले असून तेथील सुरेश शिंदे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. जामखेड पोलीस ठाण्याचे सुनिल पाटील यांच्या ताब्यात नगर शहर वाहतूक शाखा सोपविण्यात आली आहे. नियंत्रण कक्षेतील संभाजी पाटील यांची साई मंदीर सुरक्षेत नेमणुक करण्यात आली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे गोविंद ओमासे यांची तेथील कारकिर्द मोठी वादग्रस्त होती. तरी देखील त्यांनी आपला कार्यकाळ यशस्वी पुर्ण केला असून त्यांच्या हाती शेवगाव पोलीस ठाण्याचा पदभार सोपविला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ उंबरकर यांना संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातून संगमनेर शहरात दिले आहे. लोणी पोलीस ठाण्यात असताना जाहिरातबाजी नडलेले जिल्हा वाहतूक शाखेचे नितीन पगार यांची बदली जामखेड पोलीस ठाण्यात केली आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे मनोहर इडेकर यांची बदली पाथर्डी पोलीस ठाणे तर साई मंदीर सुरक्षेत असणारे सचिन जाधव यांची शिर्डी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. नगर वाचक शाखेतील विकास थोरात यांची कोपरगाव शहर येथे तर त्यांच्या जागी पोलीस उपनिरीक्षक विश्वानाथ निमसे यांची बदली केली आहे. नेवाशाचे गणेश जांभळे यांना श्रीगोंदा तर अमोल गंगलवाड यांना कोपरगाव तालुका ते राहाता पोलीस ठाणे नियुक्त करण्यात आले आहे. सुनिल सुर्यवंशी यांची नियंत्रण कक्ष ते नेवासा, प्रदिप शेवाळे यांची श्रीरामपूर शहर ते जिल्हा वाहतूक शाखा श्रीरामपूर विभाग व अर्चना करपुडे यांची राहाता ते कोपरगाव शहर अशा 23 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

खात्याची प्रतिमा संभाळा, बस….!
तत्कालीन अधिकार्‍यांनी हजर झाल्यावर ठाण्यात मोठे फेरबदल केल्याचे लक्षात येते. तसेच अर्थपुर्ण तडजोडींच्या चर्चेचा मोठा बोलबाला होता. मात्र शर्मा यांनी वर्षभरानंतर केवळ दोन वेळा अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहे. तुमच्या मर्जीनुसार कामे करा. मात्र नरगरिकांच्या मनात खात्याविषयी सुरक्षीततेची भावना निर्माण करण्याचे काम करा. सामान्य मानसांना न्याय द्या. प्रत्येकाच्या तक्रारींचे निरसण करा, गुन्हे निर्गती, स्मार्ट पोलिसिंग, पोलीस दलाची प्रतिमा अशा विविध गोष्टींचा ध्यास घेऊन शर्मा यांनी आजवर पारदर्शी काम केले आहे

LEAVE A REPLY

*