रात्रीतून 225 टँकर दूध बाजारात

0

अडीच हजार खाकीचे बळ बंदोबस्ताला

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी बळीराजा रस्त्यावर उतरला आहे. मात्र या आंदोलनाला राजकीय वलय लागल्यामुळे सरकारने आंदोनाला विरोध करून भाजीपाला व दूध पोलीस संरक्षणात बाजारपेठेत उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीतून तब्बल 225 दुधाचे टँकर व भाजीपाला स्थानिक व पुणे, मुंबईतील बाजारात दाखल झाले. त्यामुळे खाकीचे 80 टक्के बळ हे आंदोलनाच्या बंदोबस्ताला लागल्याचे दिसत आहे.
शासनाने शेतकर्‍यांच्या मागण्यांना बगल दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. मात्र शेतकर्‍यांच्या आडून या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न राजकीय वर्तुळातून केला जात असल्याचे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी व राजकीय नेते रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलक नसून शेतकर्‍यांचे व शासनाचे विरोधक आहे. त्यामुळे यांना न जुमानता शेतमाल, दूध व रेशन बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावा, असा आदेश सरकारने काढला आहे.
त्यामुळे शेतमाल, दूध व रेशनच्या वाहनांना पोलीस संरक्षण द्यावे, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षकांना दिला आहे. त्यानुसार जिल्हाभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीराम डेअरी, प्रभात डेअरी, किसान डेअरी, थोरात दूध, राजहंस दूध, खाजगी टँकर, भाजीपाला ट्रक, तांदूळ ट्रक, शेतमालाची वाहने असे विविध गाड्या जिल्ह्याबाहेर पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्यासाठी आरसीपी प्लाटून, एसआरपीएफ प्लाटून, स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी, मुख्यालयातील कर्मचारी असा मोेठा फौजफाटा रोज रस्त्यावर गस्त घालत आहे. या दरम्यान औरंगाबाद रोड, जामखेड रोड, संगमनेर रोड, नाशिक, सुपा, पुणे, कल्याण बायपास, मंचर रोड अशा विविध ठिकाणाहून तीनशे पेक्षा जास्त तर दोन दिवसात 225 पेक्षा जास्त दूध टँकरांना पोलीस संरक्षणात बाजारपेेठेत पाठविले आहे.
वस्तूंचा तुटवडा पडल्यानंतर त्याची बाजारात आणावा लागतो तर अधिक उत्पादनानंतर बाहेर पाठवावा लागतो. या आंदोलनामुळे काही शेतकरी शेतमाल विकत आहे तर व्यापारी तो माल छुप्या पद्धतीने बाजारपेठेत नेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जिल्हाबाह्य दळणवळणाला बेकायदेशीर दळणवळणाचे स्वरुप आल्याचे चित्र राज्यभर पहावयास मिळत आहे.

पोलीस 24 तास रस्त्यावर दिसतील
जिल्ह्यात पोलीस बळ विभागले गेले आहे. शहरांतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. आंदोलने आटोपल्यानंतर 24 तास रस्त्यावर पोलीस दिसतील, अशी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वाहनांची तरतूद देखील करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

आत्मचिंतनाची गरज
राज्यात शेतकर्‍यांची आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान पोलीस बंदोबस्तात भाजीपाला, दूध यांचा पुरवठा केला जात आहे. अशावेळी शेतकर्‍यांनी मालट्रक अडविला तर त्यांना विरोध करण्यासाठी पोलीस मध्यस्थी करतात. त्यांच्याशी अनवधानाने अंगलट होते. अशा वेळी पोलीस जीवघेणा हल्ला करणे (307), सरकारी कामात अडथळा आणणे (353), दरोडा टाकणे (395), सरकारी कामगारास मारहाण (332) यासारखी गंभीर कलमे दाखल करतात. खरोखर पोलिसांचा जीव घेणे, दरोडेखोर बनणे, असा आंदोलकांचा उद्देश आहे का? यासाठी पोलीस प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.  

चोरट्यांना रान मोकळे
शहरांसारख्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला जातो. त्यामुळे गस्त, नाकाबंदी, पेट्रोलिंग, बीटमार्शल आपापल्या हद्दीत फिरत असतात. त्यामुळे चेन स्नेचिंग, बॅग, मंगळसूत्र, गंठण खेचणे, चोर्‍या, रस्तालूट, घरफोड्या यांचे प्रमाण कमी होते. आता पोलीस बंदोबस्त आंदोलनात व्यस्त असल्याचा फायदा घेत चोरट्यांना रान मोकळे झाले आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याची कबुली पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*