जिल्ह्यात संभाव्य 223 पूरग्रस्त गावे

0
आरोग्य विभागाकडून साथजन्य रोग प्रतिबंद आराखडा

ज्ञानेश दुधाडे

अहमदनगर – पावसाळ्याच्या तोंडावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील संभाव्य 223 पूरग्रस्त गावे जाहीर केली आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणी साथजन्य आजार उद्रेक होऊ नयेत, यासाठी आरोग्य खात्याने विविध उपाय योजना आतापासून सुरू केल्या असून वैद्यकीय अधिकारी, औषधांचा पुरेसा साठा, नियंत्रण कक्षाची निर्मिती केली आहे.
दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने साथरोग नियंत्रण, नैसर्गिक आपत्ती व पुरपरिस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात येतो. यात गेल्या तीन वर्षात सातत्याने पावसाळ्यात जलजन्य आजार, काविळ, हिवताप, गोवर, चिकनगुणीया, विषाणूजन्य आजार ताप, डेंग्यू सदृष्य साथ, आदी साथजन्य आजारांचा उद्रेक गावे शोधण्यात आली असून या ठिकाणी यंदा पुन्हा प्राधान्याने लक्ष कंेंद्रीत करण्यात येणार आहे.
पावसाळ्यात आणि पावसाळ्या पश्‍चात जलजन्य आणि किटकजन्य आजारांच्या साथ निर्माण होत असते. पाण्याचे स्त्रोत दुषित झाल्याने गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढतात. पुराच्या पाण्यामुळे लेप्टोस्पॉययरॉसिस आजार होण्याची शक्यता असते. पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होवून हिवताप, डेंग्यू, चिकनगुण्या सारखे कीटकजन्य आजारांचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी कृती आरखड्यात नियोजन करण्यात आले आहे. मात्र, दरवर्षी आरोग्य विभागाकडून तयारी करूनही पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर साथीचे आजार पसरलेले आहेत.
जिल्ह्यातील तालुक्यातील संभाव्य पूरग्रस्त गावे
नगर – जेऊर, वगडगाव गुप्ता, नालेगाव, बुरूडगाव, शिराढोण, साकत, वाटेफळ, वाळुंज, रुई छत्तीसी.

अकोला – भंडारदरा, शेंडी, माळेगाव, कोदणी, पेलविहीरे, दिगांबर, चितळवेढे, निम्रळ, निळवंडे, विठा, मेहंदुरी, रुंभोडी, इंदोरी, सावंतवाडी, म्हाळादेवी, उंचखडक बु आणि खु, टाकळी, अकोले, सुगांव बु आणि खु, कुंभेफळ, कळस बु, कळस खु.

संगमनेर – धांदरफळ बु आणि खुर्द, रायते, खराडी, वाघापूर, वाघापूर, वेळापूर, संगमनेर, जार्वे, आश्‍वी बु, कनकापूर, कनोली, दाढ खुर्द, शेडगाव, आश्‍वी खुर्द, राजापूर, मंगळापूर, का. दुमला, दाढ बु, हनुमंत गाव, पाथरे बु, कोल्हार, कडित बुद्रुक
श्रीगोंदा – काष्टी, सांगवी दु, बोरी, हंगेवाडी, वांगदरी, आर्वी, अनगर, पाचपुते वस्ती, अजनुज, कौठे, नि.खुले, गार, हंगेवाडी वस्त्या, पांगदरी वस्त्या, पेडगाव.
श्रीरामपूर – कडित खु, मांडवे, कुर्‍हाणपुर, फत्याबाद, गळनिंब, उक्कलगाव, एकलहरे, बेलापूर, पढेगाव, लाडगाव, चंद्रापर, मांलूजे, नरसाळी, खिर्डी, चांगी खु आणि बु, सराला, गोधर्वन, महांकाळ वडगाव, नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, मातुळठाण, भामाठाण, खानापूर.
राहुुरी – कमलापूर, घानोरे, सोनेगाव, सात्रळ, रामपूर, कोल्हार, चिचोंडी, दवणगाव, आंबी, अमलनेर, केसापूर, संक्रापूर, गंगापूर, पिंपळगाव, चांदेगाव, ब्राम्हणगाव, बोधेगाव, लाख मालुंजा खु, महलगाव, खुडसरगाव, पाथरे, कोपरे, तिळापूर, सेलवडगाव, माहेगाव, तांदूळवाडी, वळण, आरडगाव, मानोरी, मांजरी, वांळुजपोही, चंनकापूर, पिंप्री, कोंढवड, बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी बुद्रुक, देसवंडी, राहुरी खुर्द.
नेवासा – नेवासा खु, बहिरवाडी, गोघेगाव, गोनेगाव, आंबळनेर, इमामपूर, घामोरी, चिंचवन, अबळनेर, निंभारी, खलाल पिंप्री, मुरमे, प्रवरासंगम, खेडले बुद्रुक, सिलेगाव, खेडले परमानंद, करजगाव, पानेगाव, खेडले खुर्द.
कर्जत – निमगावगांगर्डा, उंबरी, रातनजन, तिखी, नागवाडी, तारडगाव, मलठाण, नागापूर, निंबोडी, चिंचपूर, जलालपूर, सिध्दटेक, देवूळवाडी, दरेडी, दुधोडी, अंभोरा, हिंगणगाव, गणेशवाडी, खेड, औटीवाडी, सिंपोरा, बाभूगाव.
जामखेड – कौडगाव, चोंडी, आघी.
कोपरगाव- मोरवीस, चास, मंजूर, वेळापूर, सांगवी भुसार, सुरेगाव, कोळगाव थंडी, कान्हेगाव, मळेगाव, कुंभारी, घारणगाव, हिंगणी, मुरशेतपूर, चांदगव्हाण, डाऊच बु, कोकमण, डाऊच खु, संवत्सर, जेऊर कुंभारी, मायगाव देवी, मालेगावथडी.
राहाता- पुणतांबा, मुंगी, रेणवाडी, चोभूत.
पारनेर – शिरापूर, वडनेर, ढवनगाव, गुनवडी, म्हसे खु, कुरूंद, मांडवे खु, देसवडे, तास, वडनेर खु, वांगी, शिपोरा.

LEAVE A REPLY

*