Video : उत्तराखंडमध्ये नाशिकचे २२२ भाविक सुरक्षित

0
नाशिक : उत्तराखंडमध्ये नाशिक चे 222 भाविक सुखरूप आणि सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती नाशिकमधील चौधरी यात्रा कंपनी आणि श्रीराम यात्रा कंपनी व केसरी टूर्स कंपनीकडून देण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे काल(दि.१९) भूस्खलन झाल्याने 15 हजार भाविक अडकले होते त्यात जवळपास २२२ भाविक नाशिकहून गेलेले आहेत.

चारधाम यात्रेला सुरुवात झाल्याने उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. मात्र भूस्खलन झाल्याने हजारो भाविक अडकल्याने अडकले आहेत.

चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9 किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यासोबतच हृषिकेश-बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावरील 60 मीटर भागाचे भूस्खलनामुळे नुकसान झाले आहे. मात्र यामध्ये कोणत्याही भाविकाला दुखापत झालेली नसल्याची माहिती देण्यात आली होती.

दरम्यान, चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी देशदूतशी बोलतांना सांगितले की दहा भाविक आमच्या कंपनीकडून यात्रेला रवाना झाले असून सर्व सुखरूप आहेत. लवकरच ते परतीच्या मार्गाला लागणार असून नाशिक गाठणार आहेत.

येवल्याचे 110 भाविक खाजगी रित्या यात्रेला गेलेले आहेत तर श्रीराम यात्रा कंपनीकडून ९६ भाविक, केसरी टूर्स 2
भाविक यात्रेसाठी गेलेले आहेत.

LEAVE A REPLY

*