Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमनमाडमध्ये करोनाचे एकाच दिवशी आढळले १५ रुग्ण; चार चिमुकल्यांचा समावेश; जिल्ह्यातील रुग्णसंख्या...

मनमाडमध्ये करोनाचे एकाच दिवशी आढळले १५ रुग्ण; चार चिमुकल्यांचा समावेश; जिल्ह्यातील रुग्णसंख्या १३१५ वर

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगाव, नाशिक, सिन्नर व येवल्यामध्ये करोना रुग्णांची संख्या वाढलेली असतानाच आज दुपारी आलेल्या अहवालात एकट्या मनमाड शहरात १५ रुग्ण पॉझिटिव्ह  आले आहेत. यामध्ये चार चिमुकल्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

आज जिल्ह्यात नव्याने २२ बाधित रुग्ण वाढले आहेत. यामध्ये चार चिमुकल्यासह १५ बाधित रुग्ण मनमाड शहरातील आहेत. तर इगतपुरी तालुक्यातील रायाम्बे येथील दोन, येवल्यातील दोन, नांदगावमधील दोन आणि आडगाव पोलीस मुख्यालयातील एका रुग्णाचा समावेश आहे.

आज वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या  १३१५ वर पोहोचली आहे. आज सकाळी प्रयोगशाळेकडून ९१ अहवाल प्राप्त झाले. यात ६९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये १५ रुग्ण हे मनमाडमधील आहेत. इगतपुरी तालुक्यातील रायंबेतील दोन महिला, येवल्यातील पाडले गल्लीतील दोघे, तर नांदगावातील वाडाळीतील एक महिला बाधित आले आहे.

आडगाव पोलीस मुख्यालयात आणखी एक पोलीसाला कोरोनाची लागण झाली आहे . या २२ रुग्णात मनमाडमधील १५ रुग्णामध्ये चार व सहा वर्षांचा मुलगा, तर ५ व ७ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या