22 प्रभागातील ठेके रद्द करण्याची हालचाल

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-महानगरपालिका हद्दीत 37 प्रभागांपैकी 22 प्रभागांमध्ये साफसफाईचे ठेके देण्यात आले आहे. मात्र त्या भागांमध्ये दरमहा 70 लाख रुपये खर्च करुन देखील योग्य पद्धतीने साफसफाई होत नाही.
त्यामुळे सर्वच 22 ठेके रद्द करण्याची हालचाल सुरु झाली आहे.
शहरात साफसफाईसाठी मनपा प्रशासनामध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने 37 प्रभागांपैकी 22 प्रभागांमध्ये सफाईचे ठेके दिले आहे. परंतु शहरात सफाईचा प्रश्न कायम आहे.

शहरात प्रत्येक ठिकाणी कचर्‍याचे ढिग साचले असून दुर्गंधी येवू लागली आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील मेहरुण, तांबापूर, शनिपेठ, जुने जळगाव, हरिविठ्ठल नगर यासह शहरातील काही भागांमध्ये कचरा साचलेला आहे.

नाले सफाई करतांना गाळ तसाच नाल्यांच्या काठावर ठेवल्याने तो देखील रस्त्यांवर आला आहे. पावसाळा सुरु झाल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.

22 प्रभागांमध्ये दरमहा साफसफाईवर 70 लाख रुपये खर्च केले जातात. मात्र त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही.

त्यामुळे 22 प्रभागांमध्ये देण्यात आलेले ठेके रद्द करुन प्रशासनाच्या वतीनेच सफाई करणे शक्य होईल का? याबाबत चाचपणी सुरु आहे.

LEAVE A REPLY

*