Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : पंचवटी : चिंचबन परिसरातून व्यापाऱ्याला मारहाण करत २१ लाख लुटले

Share

नाशिक/पंचवटी | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज पंचवटी परिसरात किरकोळ कारणावरून वाद घालत दोघा भामट्यांनी एका व्यापाऱ्याला २१ लाख रुपयांना लुटले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असून घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे. पंचवटी परिसरातील चिंचबन येथे हा प्रकार घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरातील एक व्यापारी २१ लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन पंचवटी परिसरातून जात होता.

यादरम्यान, या व्यापाऱ्याच्या मागावर असलेल्या दोघा भामटयांनी गाडीला कट मारल्याचे किरकोळ कारण पुढे करत व्यापाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.  हमरीतुमरीवरून वादाचे पर्यावसान हाणामारीत झाली. यानंतर गाडीची काच फोडत दोघांनी बॅग घेऊन पलायन केले.

घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी कुमक घेऊन धाव घेतली. पुढील तपास सुरु आहे.

व्हिडीओ : दीपक पगारे, पंचवटी नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!