आज असतो सर्वात लहान दिवस!

0
vox
21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. याच दिवसाला विंटर सोलस्टाइस नावानेही ओळखले जाते. पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तनादरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते.

त्याचा परिणाम 21 डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतो.

आजच्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. 25 डिसेंबर पासून दिवस मोठा होण्यास सुरूवात होते. 21 डिसेंबर रोजी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेकडे तिरप्याहोत स्पर्श करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होऊन अंधार पडते.

LEAVE A REPLY

*