Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्र पडताळणी; नाशिक जिल्हा परिषदेस मिळाले २०४ शिक्षक

Share

नाशिक । प्रतिनिधी

पवित्र पोर्टलच्या आधारे निवड झालेल्या शिक्षकांंच्या कागदपत्रांची तपासणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सोमवारपासून (दि.19) सुरू केली आहे. यामुळे त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्हा परिषदेला 204 शिक्षक मिळाले असून यात मराठी माध्यमाचे 202 तर,2 ऊर्दू माध्यमाचे शिक्षक आहेत.

राज्यातील शिक्षक भरती केलेल्या 5 हजार 822 उमेदवारांची निवड यादी शासनाने जाहीर केली. यात नाशिक जिल्हा परिषदेस 204 शिक्षक मिळाले आहेत. या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी 13 ऑगस्टपासूनच करण्यात येणार होती. त्यामुळे मंगळवारी (दि. 13) जिल्हा परिषदेत निवड यादीतील शिक्षकांनी गर्दी केली होती.

मात्र, शिक्षण विभागाने ही पडताळणी 19 ऑगस्ट रोजी करणार असल्याचे सांगितले. राज्याच्या शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी शिक्षक भरती सेंट्रल पद्धतीने ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

अर्ज मागविताना ऑनलाईनमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने अर्जदार शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. अखेर पवित्र पोर्टलचे काम पूर्ण झाल्याने शिक्षण विभागाने विनामुलाखती थेट शिक्षक भरती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

जे शिक्षक पात्र ठरले त्यांना राज्यात जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर नेमणूक देण्यात आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी शिक्षण विभागाने पहिल्या टप्यातील 5 हजार 822 उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!