गंगापूर धरणातून २००० क्युसेस पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
नाशिक | आज सकाळी वाजेच्या सुमारास गंगापूर धरणातून २००० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर श्री बालाजी मंदिर धबधबा, सोमेश्वर, नवश्या गणपती आणि गोडघाट रामकुंड परिसरात नाशिककर प्रचंड गर्दी करतात. याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क असून नागरिकांनी पाण्यात उतरून आपत्ती ओढवून घेऊ नये असे आवाहन केले जात आहे.

सकाळपासूनच याठिकाणी पाणी बघण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. मात्र गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानंतर साडेतीन तासांत पाणी नाशिक शहर परिसरात प्रवेश करते.

पोलिसांचाही परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सोमेश्वर, बालाजी मंदिर तसेच नवश्या गणपती परिसरात मोठ्या संख्येने नागरिक फिरायला आलेले आहेत.

यावेळी धोकादायक सेल्फी न काढण्याचेही आवाहन यंत्रणेकडून केले जात आहे.

 

 

LEAVE A REPLY

*