बायर कंपनीच्या चर्चासत्रात २०० शेतकऱ्यांना विषबाधा; एका शेतकऱ्याचा मृत्यू; तिघांची प्रकृती चिंताजनक

0
दिंडोरी | नाशिक – पेठ रस्त्यावरील उमराळे बुद्रुक येथे बायर कंपनीच्या चर्चासत्रा दरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या स्नेहभोजनातून २०० शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. इतर विषबाधित शेतकऱ्यांना दिंडोरी व नाशिक येथील खासगी तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

विषबाधा नेमकी कशामुळे झाली याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही.  या घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव अतुल केदार आहे. अल्पोपाहारानंतर शेतकऱ्यांना अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

बायर कंपनीकडून उमराळे बुद्रुक येथे संकरीत टोमाटो-US1143 या वाणाच्या पिक पाहणीचा कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन आज सकाळी दहा वाजता करण्यात आले होते. यात कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

उमराळ्यात बायर विरोधात संताप; विषबाधेतील मृतावर अंत्यसंस्कार; मठ्ठ्यातून झाली विषबाधा

कार्यक्रम संपल्यानंतर कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास या चर्चासत्रात उपस्थित २०० शेतकऱ्यांनी याठिकाणी भोजन केले.

भोजनानंतर एक-एक करत सर्वच शेतकऱ्यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालय तसेच दिंडोरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र यात अतुल केदारे नामक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर इतर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात असून त्यांच्यावर शेतकऱ्यांवर उपचार सुरु आहेत.

विषबाधेचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद गटनेते माजी आमदार धनराज महाले यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून उपचाराबाबत माहिती घेतली.

LEAVE A REPLY

*