Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

२० वर्षीय तरुणाची आत्महत्या; नांदगाव येथील घटना

Share

नांदगाव । प्रतिनिधी

तालुक्यातील सावरगांव येथील दिपक शेवाळे या तरुणांने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील सावरगांव येथील दुपारी २:३०सुमारास  दिपक नाना शेवाळे (२०) या तरुणांने लिबांच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीस पाटील सोमनाथ शेलार यांनी पोलीसांत दिली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान, मुलास मोबाईलचे वेड होते अशी माहिती पालकांनी दिली. मयत दीपक याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ नाशिक येथे UPSC परिक्षेची तयारी करीत असल्याचे समजते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!