जिल्ह्यात 20 टक्के पाऊस

0

सर्वाधिक नेवासा, राहात्यात नोंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- गत पाच दिवसांत नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून शेतकरी सुखावला आहे. अनेक ठिकाणी बंधार्‍यांमध्ये पाणी येत आहे. या पावसाची नोंद सरासरी 19.89 टक्के झाली आहे. सर्वाधिक पाऊस नेवाशात 34.82, त्या खालोखाल राहाता तालुक्यात 29.76 टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी या कालावधीत या पावसाचे प्रमाण केवळ साडेसहा टक्के होते. सहाव्या दिवशीही नगर व अन्य भागात पावसाने हजेरी लावली.
मृग नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार हजेरी लावली. अनेक ठिकाणी आढेनाले भरभरून वाहू लागले असून पाथर्डी तालुक्यातील करंजी भागातील बंधार्‍यांमध्ये पाणी साचू लागले आहे. नेवाशातही गतवर्षीच्या तुलनेत यंदा मृगाच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. ओढ्याला आलेल्या पुरात नेवाशातील तरूण वाहून गेल्याने मृत्यू झाला. अनेक ठिकाणी वादळी तडाखा बसला आहे. रविवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात पाणीच पाणी झाले होते. शेवगावमध्ये 55 रव कर्जतमध्ये 65, राहुरीत 29 मिमी पावसाची नोंद झाली.
रविवारी शेवगाव, पाथर्डी, नगर, पारनेर, जामखेड, कर्जत आणि राहुरीत जोरदार पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यात कुठेही फारसा पाऊस पडला नाही. समाधानकारक पाऊस झाल्याने नि संप मिटल्याने शेतकरी आता पेरणीपूर्ण मशागतीच्या कामाला गुंतला आहे. नेवासा, पाथर्डी व अन्य काही ठिकाणी कपाशीची लागवड सुरू आहे. सोयाबीनसाठी रानं तयार केली जात आहेत.

रविवारी मंडळनिहाय पडलेला पाऊस (मिमी)
नेवा सा ः कुकाणा 5,चांदा 37, घोडेगाव 19, वडाळा बहिरोबा 62, सोनई 22. नगर ः नालेगाव 19, जेऊर 59, रूईछत्तीशी 16, कापूरवाडी 20, केडगाव 52, चास 9, भिंगार 35, नागापूर 11, वाळकी 15, सावेडी 12. राहुरी ः वांबोरी 29, देवळाली 28, ब्राम्हणी 25, टाकळीमिया 43. राहाता ः 16, पणितांबा 3,संगमनेर ः 6, साकूर 10, घारगाव 37, डोळासणे 18, पिंपरणे 25. अकोले ः 4, राजूर 7, समशेरपूर 4, साकीरवाडी 11. कोपरगाव ः6, सुरेगाव 22, दहिगाव बोलका 10,श्रीगोंदा ः 15, चिंभळा 18, मांडवगण 12. कर्जत ः कर्जत 65, राशिन 17, कोंभळी 62, माही 89, मिरजगाव 10, जामखेड ः 17, खर्डा 31,नायगाव 35, अरणगाव 63, नान्नज 19.पाथर्डी ः टाकळीमानूर 30, कोरडगाव 26, करंजी 9, माणिकदौंडी 16. 

भंडारदर्‍यात नव्याने पाणी

भंडारदरा (वार्ताहर) – उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणात नव्याने 8 दलघफू पाणी दाखल झाले असून धरणातील पाणीसाठा 1710 दलघफू झाला आहे. गेल्यावर्षी या काळात केवळ 443 दलघफू पाणी होते. गत 24 तासांत भंडारदरा 15, घाटघर 14, रतनवाडी 17 मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून पाणलोटात रिपरिप सुरू होती.  

 

 

LEAVE A REPLY

*