Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये वीस दिवस पुरेल इतका ‘रक्तसाठा’

नाशिकमध्ये वीस दिवस पुरेल इतका ‘रक्तसाठा’

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात रक्ताचा तुटवडा असतांना नाशिकमध्ये मुबलक रक्तसाठा उपलब्ध आहे. रस्त्यावर वाहनेच नसल्याने सुदैवाने अपघातांचे प्रमाण घटल्याने रक्ताची मागणी कमी झाली आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती तसेच आदिवासी भागातील महिलांंनाच रक्ताची आवश्यकता भासत असून 20 दिवस पुरेल इतका रक्तसाठा नाशिकमध्ये उपलब्ध आहे.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदानाला देखील ब्रेक मिळाला आहे. सध्या अपघातातील जखमी व नियमित शस्त्रक्रियेसाठी रक्ताची मागणी कमी असल्यामुळे तुटवडा जाणवत नसला तरी येत्या काळात बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे.

शिबिर घेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. करोनाच्या संसर्गाच्या भितीमुळे सध्या रक्तदानाचे प्रमाण मंदावले आहे. करोना व रक्तदान यांचा परस्पर काहीही संबध नसून प्राथमिक तपासणी करून कुणालाही रक्तदान करता येते. करोनाचा संसर्ग रक्तदान करतांना होऊ शकतो हा समज चुकीचा असून जिल्हा रुग्णालय आणि खासगी रक्तपेढीत रक्तदानासाठी वेगळा कक्ष आहे. त्यामुळे करोनाला घाबरून रक्तदान न करणे ही बाब चुकीची आहे. नागरिकांनी स्वत:हून रक्तदानासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

वैयक्तीक या…

सध्या करोनामुळे एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करण्याऐजी इच्छूकांनी दोन ते तीनच्या संख्येने रक्तपेढींमध्ये येऊन रक्तदान करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्हा रगणालय रक्तपेढीत 20 दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे.
आम्ही रक्तदात्यांशी संपर्क केला आहे. ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी शासकिय वा खासगी रूग्णालयाच्या रक्तपेढीशी संपर्क करावा.

गौरव शितोळे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा रुग्णालय 

रक्ताची मागणी कमी झाली आहे. आणखी 12 ते 15 दिवस पूरेल इतका रक्तसाठा आहे. नागरिकांनी गेल्या काही दिवसात रतक्तदानाला चांगला प्रतिसाद दिला. आम्ही सध्या शिबीरे थांबवली असून पुढील नियोजन सुरू आहे. आम्ही रक्तदात्यांच्याही संपर्कात आहोत.

विनय शौचे, जनकल्याण रक्तपेढी, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या