Type to search

नंदुरबार

20 हजाराची लाच मागणार्‍या हवालदाराला अटक

Share

तळोदा । श.प्र.- 20 हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी येथील पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली असून एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दि. 8 जून रोजी तक्रारदाराच्या रिकाम्या प्लॉटवर एका इसमाने त्यांची पूर्वपरवानगी न घेता अतिक्रमण केले. त्याबाबत तक्रारदाराने संबंधीत व्यक्तीस विचारण्यास गेले असता त्याने दमदाटी केल्याबाबत तक्रारी अर्ज दिला होता. सदर अर्ज हवालदार दशरथ राजाराम चव्हाण यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी आला असता त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करुन वाद मिटविला. म्हणून हवालदाराने तक्रारदाराकडे दि. 11 जुलै रोजी 25 हजार रुपये व तडजोडीअंती 20 हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. मात्र त्यानंतर चव्हाण याने लाच स्विकारण्यास टाळाटाळ केली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!