#2Point0 : ‘2.0’चे प्रदर्शन लांबणीवर

0

‘2.0’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे.

याआधी हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

मात्र आता तो 27 एप्रिल रोजी प्रदर्शित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. याआधी हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा चर्चा होत्या. मात्र चित्रपटात महत्त्वाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट त्याच दिवशी प्रदर्शित होत असल्याने निर्मात्यांनी तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

अक्षय कुमारचे पॅडमॅन व 2.0 चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यास त्याचा चित्रपटाला फटका बसू शकतो असे निर्मात्याकडून सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*