Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आडगाव परिसरात 2 चैन हिसकावल्या; दुचाकीवरील भामट्यांची 1 लाखाची लूट

Share

नाशिक । प्रतिनिधी

शहर व परिसरात सोनसाखळ्या हिसकवण्याचे सत्र सुरूच असून सलग दोन दिवसात विविध ठिकाणी आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख रूपयांचे दागिणे हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

पारसमणी गणपती ते अमृतधाम रोडवर शनिवारी (दि.15) रात्री दहा वाजेच्या सुमारास प्रज्ञा स्वप्नील पटाडे (बकंसल सीटी, भोसरी, पुणे) या रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 65 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत हिसकावून पळ काढला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक चांदणी पाटील करत आहेत.

दुसरी घटना रविवारी (दि.16) रात्री 9 वाजेच्या सुमारास आडगाव परिसरातीलच चोंडेश्वरीनगर येथे घडली. या प्रकरणी शतील संदिप उदार (रा. ज्ञानेश्वरनगर, दसक, जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार उदार या रविवारी रात्री हनुमाननगर ते शिवनगर रोड दरम्यान रस्त्याने पायी चालत असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक निरिक्षक बिडगर करत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!