Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये रात्रभर कोसळधार; २०७ मिलीमीटर पावसाची नोंद

Share

नाशिक | प्रतिनिधी 

दोन दिवस पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचे मुसळधार आगमन झाले आहे. आजच्या पावसाने नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीनुसार शहरत २०६.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यातही दिलासादायक पाऊस झाल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

मध्यरात्री बारा वाजेपासून पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान, सकाळी साडेदहा वाजेनंतर पावसाने काहीशी विश्रांती शहरात घेतलेली दिसून आली.

शहरातील रविवार कारंजा, सीबीएस, अशोकस्तंभ, सातपूर, गंगापूर रोड, इंदिरानगर, देवळालीगाव, पंचवटी, नाशिकरोड, सिडको परिसरात पावसाने हजेरी लावल्याने गल्लीबोळ, रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

आजच्या पावसात वादळ, मेघगर्जना झाल्या नसल्याने शांत स्वरूपात आलेल्या पावसामुळे विजेचा लपंडाव अगर कुठलीही हानी शहरात झालेली दिसून आली आहे.

बळीराजाला दिलासा

ग्रामीण भागात दिलासादायक पाऊस पडल्यामुळे पेरण्यांना गती मिळणार आहे. त्र्यंबक, इगतपुरीसह पेठ सुरगाणा तालुक्याच्या काही भागात भात आवणीसाठी सुरुवात झाली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून आलेली आजची पावसाची आकडेवारी\

1) Nashik. 20.0/242.7 mm
2)Igatpuri 91.0/733.0 mm
3)Trymbak 11.0/139.0 mm
4)Dindori. 43.0/119.0mm
5)Peth. 23.0/563.8mm
6) Niphad. 7.0/63.9mm
7)Sinnar. 2.0/85.0mm
8)Chandwad 10.0/44.0 mm
9)Deola. 4.4/35.1mm
10)Yeola. 1.0/205.0mm
11)Nandgaon 6.0/53.0 mm
12)Malegaon 0.0/115.0 mm
13)Baglan. 2.0/95.0mm
14)Kalwan. 2.0/17.0mm
15) Surgana. 22.3/291.3mm

Total 244.7/2801.8mm
Todays Dist Average 16.31mm
Total dist average 186.78mm
District rainfall july month average 20.15mm

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!