‘२.०’ सिनेमाने ५०० करोड कमाईचा जादुई आकडा ओलांडला

0

मुंबई : दिग्दर्शक एस. शंकर यांनी ‘२.०’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला. जवळपास तीन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुपरस्टार रजनीकांत, खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार, एली अवराम यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच विक्रम मोडीत काढत काही नवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचं पाहायला मिळालं.

‘२.०’च्या हिंदी व्हर्जनशी जोडला गेलेला निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याने माहिती देत आतापर्यंत या चित्रपटाने ५०० कोटींच्या कमाईचा आकडा ओलांडल्याचं स्पष्ट केलं आहे. सोबतच धर्मा प्रॉडक्शन या चित्रपटाशी जोडलं गेल्याचा अभिमान वाटत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही या चित्रपटाची अफलातून कमाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

*