195 गावांत सरपंचपदासाठी उद्या मतदान

0

प्रचाराच्या तोफा थंडावल्या दिवाळी अगोदर ‘लक्ष्मी’ दर्शनाची चर्चा 

संगमनेरमधील जोर्वे, मालुंजे कर्जतमधील कोपर्डी अतिसंवेदनशील गावे
10 सरपंच आणि 15 सदस्य बिनविरोध

अहमदनगर (प्रतिनिधी)- शनिवारी 7 ऑक्टोबरला होणार्‍या 195 ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा गुरूवारी सायंकाळी 5.30 थंडावल्या. शुक्रवारी (आज) मतदान साहित्य, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त निवडणुका असणार्‍या गावात पोहचणार आहे. शनिवारी कडेकोट बंदोबस्तात सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी दिवाळी अगोदरच ‘लक्ष्मी’ दर्शन होऊ लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, संगमनेर तालुक्यातीली जोर्वे ग्रामपंचायतीचे 5 आणि मांलुजे ग्रामपंचायतीचे 3 मतदान केंद्र तर कर्जत तालुक्यातील कोपर्डी ग्रामपंचायतीमधील 3 असे एकूण 11 मतदान केंद्र अतिसंवेदनशील ठरवण्यात आले आहेत. या ठिकाणी भरारी पथकासह पोलीसांचा खडापहारा राहणार आहे. तर 43 ग्रामपंचायतीमधील 227 मतदान केंद्र संवेदनशील ठरवण्यात आलेली आहे. या ठिकाणी चोख बंदोबस्त राहणार आहे. शनिवारी होणार मतदानासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी निवडणूका जाहिर केल्या होत्या. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमदेवारी अर्ज माघारीपर्यंत 10 सरपंचपदाच्या आणि 15 सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे आता 195 ग्रामपंचाायतींसाठी शनिवारी मतदान होणार आहे. पहिल्यांदा जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगले तापले होते.

प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतरही छुप्प्या प्रचार सुरू आहे. यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ केली आहे. यात सरपंचपदासाठीच्या उमेदवारांना 50 हजार ते पावणेदोन लाख रुपयांपर्यंतची खर्च मर्यादा आहे.
या आधी ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांकरिता निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणुकीमध्ये करावयाच्या खर्चाची मर्यादा सर्व ग्रामपंचायतींसाठी सरसकट 25 हजार एवढी होती.

परंतू यावेळी सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने राज्य निवडणूक आयोगाने 21 ऑगस्ट 2017 रोजी आदेश काढून निवडणूक लढवणाजया सदस्य व सरपंचपदाच्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात दुपटीने वाढ केली आहे. प्रचाराचे अजून तीन दिवस राहिलेले आहेत. अखेरच्या दिवशीच उमेदवार अमाप खर्च करतात, परंतु आता त्यांना घालून दिलेल्या मर्यादेतच खर्च करावा लागणार आहे.
………….
सरपंचाची मतपत्रिका सर्वांत वर
मतदानयंत्रावर सरपंचपदाच्या उमेदवारीची मतपत्रिका सर्वांत वरच्या कडेला असून, तिचा रंग फिक्कट निळा असेल. त्याखाली वॉर्डनिहाय जास्तीत जास्त तीन उमेदवारांच्या मतपत्रिका असतील. त्यामुळे काही ठिकाणी मतदारांना पहिल्यांदाच चार मते द्यावी लागणार आहेत.
………..
विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र
या निवडणुकीपासून निवडून येणार्‍या सदस्य, तसेच सरपंचांना निवडणूक शाखेतर्फे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याआधी जिल्हा परिषद सदस्य किंवा विधानसभा, लोकसभा सदस्यांना असे प्रमाणपत्र दिले जात. परंतु आता ग्रामपंचायत सदस्यांनाही प्रमाणपत्रे मिळणार असल्याने त्यांच्यात वेगळाच आनंद आहे.
……………
मतदान प्रक्रिया पारपाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 1 केंद्रप्रमुख, 3 मतदान अधिकारी आणि 1 शिपाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या कर्मचार्‍यांना आतापर्यंत दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले असून शुक्रवारी आज शेवटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
………….
निवडणुक आयोगाच्या सुचनेनूसार यंदा निवडणुक प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येणार असल्याने उमदेवारांचे अर्ज, त्यांचे प्रतिज्ञान पत्रे, विविध दाखले हे ऑनलाईन भरण्यात आलेले आहेत. यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर ही सर्व माहिती निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर सार्वत्रिक करण्यात येणार आहे. यामुळे ही सर्वांना पाहता येणार आहे.
……………
या निवडणुकीच्या मतदानासाठी ईव्हीएम मशीन उपलब्ध झाल्या असून या आज त्या बंदोबस्तात निवडणुक असणार्‍या तालुक्यातील गावात रवाना करण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर त्या संबंधीत तालुक्याच्या ठिकाणी स्टाँग रुममध्ये ठेवण्यात येणार आहे. मतदानासाठी 1 हजार 712 बॅलेट युनिट आणि 856 कंट्रोल युनिट उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
…………….

दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश –
दिनांक 6 ऑक्टोबर 2017 रोजी मतदानाचे एक दिवस अगोदर संपूर्ण दिवस, दिनांक 7 ऑक्टोबर 2017 रेाजी मतदानाचे दिवशी संपेपर्यत व दिनांक 9 ऑक्टोबर 2017 रेाजी मतमोजणीचे ठिकाणी मतमोजणी संपेपर्यत. निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीच्या सीमेलगतच्या गावातील असणारे सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने व परवानाकक्ष हॉटेल्स, एफएल बीआर, ताडी विक्री दुकाने बंद ठेवण्यांचे आदेश दिले आहेत. सदरच्या दिवशी दारू दुकाने उघडी असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

 

 

LEAVE A REPLY

*