190 दृष्टीहिनांना मिळाली नवी दृष्टी

0
जयेश शिरसाळे,जळगाव  / उत्तर महाराष्ट्रात एकमेव असलेल्या मांगीलाल बाफना नेत्रपेढी व चिकित्सालयाच्या साहाय्याने 190 दृष्टीहीनांना नवी दृष्टी दिली मिळाली असून गेल्या 17 वर्षात 395 जणांनी नेत्रदान केले आहे.
उद्या दि.10 जुन रोजी जागतिक दृष्टिदान दिन आहे. नाशिक येथील तत्कालीन जिल्हा शल्यचिकीत्सक नेत्रतज्ञ स्व.डॉ. रामचंद्र भालचंद्र यांच्या सेवाकार्याचे स्मरण म्हणून जागतिक दृष्टिदान दिन राज्यशासनाकडून साजरा करण्यात येतो.

नेत्रदान हे श्रेष्ठदान आहे. नेत्रदानाविषयी अनेक गैरसमज असले तरी सामाजिक संस्थानकडून नेत्रदानाबाबची जनजागृती केली जात असल्याने नेत्रदान करण्यार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

विशेषत तरुणापिढी नेत्रदानाविषयी सकारात्मता असल्याचे दिसून आले आहे. केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित स्व. मांगीलाल बाफना नेत्रपेढी व चिकीत्सालयाचे कार्य सन 1999 पासून 24 तास अविरतपणे सुरु आहे.

मांगीलाल बाफना नेत्रपेढी मध्ये नेत्रप्रत्यारोपण सेंटर असून गेल्या 17 वर्षात 15 हजारांहुन अधिक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला असून यात विद्याथ्यार्ंची संख्या अधिक आहे.

परंतु नेत्रदानाचा संकल्प केलेल्यांचा जर मृत्यू झाला तर कुटुंबियांनी याबाबत नेत्रपेढीला कळविले पाहिजे. अनेकदा कुटुंबिय कळवित नसल्याची खंत मांगीलाल बाफना नेत्रपेढीच्यावतीने व्यक्त करण्यात आली.

मयत झालेल्यांची माहिती कुटुंबियांनी 4 ते 6 तासांच्या आत नेत्रपेढीला दिल्यास मयताचे डोळे काढून दृष्टीहीनांना देण्यात मदत होईल.

नेत्रदान केलेल्या व्यक्तीबाबत गुप्तता ठेवली जात असल्याचेे मांगीलाल नेत्रपेढीच्या व्यवस्थापिका राजश्री डोलारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*