Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मनमाड, येवल्याची तहान भागणार; करंजवण @ ९० टक्के; १८ हजार ३५० क्युसेकचा विसर्ग

Share

ओझे | (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे धरण आणि येवला ,मनमाडची तहान भागविणाऱ्या करंजवन धरण आज ९० टक्के भरले. दरम्यान, प्रसंगावधान राखत धरणाच्या तीन गेटमधून कादवा नदी पात्रात १८ हजार ३५० क्युसेसेने पाणी सोडण्यात आले आहे.

दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळदार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांना मोठया प्रमाणात पूर आल्यामुळे तालुकयातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे .करंजवण धरण क्षेत्रात मोठया प्नमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणात पाण्याची आवक जास्त होत असल्यामुळे वेळोवेळी पाणी वाढविण्यात येते आहे

करंजवण धरणातून दहा हजार क्युसेस पाणी सोडल्यांमुळे ओझे करंजवण पुल पाण्याखाली गेला असून या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे तसेच ओझे, करंजवण, खेडले येथील ओहाळाना पुर आला असून हे सर्व पाणी कादवा नदीत येते त्यांमुळे कादवा नदीने धोक्यांची पातळी ओलाडली आहे

करंजवण धरण भरल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह येवला ,मनमाड तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे .तसेच कादवा नदी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होत असल्यामुळे कादवा नदी काटावरिल ओझे,करंजवण,म्हेळूस्के ,लखमापूर,अवनखेंड गावाना संतर्क राहण्याचे आदेश दिंडोरी पेठचे प्रांतअधिकारी डॉ संदिप आहेर तहसिलदार बाबासाहेब गाढवे करंजवण धरण शाखा अभियंता महाजन यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!