Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात दिवसभरात १८ करोनाबाधित रूग्णांची भर; रुग्णसंख्या ५२१ वर

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात १८ करोनाबाधित रूग्णांची भर; रुग्णसंख्या ५२१ वर

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव हे करोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक पॉझिटिव्ह रूग्ण मालेगावात असले तरी जिल्ह्याच्या इतर भागातही हा आकडा वाढत चालला आहे. आज दिवसभरात मालेगावसह, येवला, सिन्नर, नाशिक शहर व बाहेरील जिल्हे अशा 18 नव्या रूग्णांची भर पडली.

- Advertisement -

यामुळे मालेगावची करोनाग्रस्तांची संख्या 420 झाली आहे. तर जिल्ह्याचा आकडा 521 वर पोहचला आहे. तर मालेगाव येथील चौघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे करोनाबळींची संख्या 18 झाली आहे.

जिल्ह्यात आज (दि.7) दिवसभरात करोनाचे 149 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 136 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 18 अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच दोघांचे अहवाल दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मालेगाव येथील 7, पर जिल्ह्यातील 7 यात 4 एसआरपीएफ जवानांचा सामावेश आहे. येवला 2, सिन्नर 1 व नाशिक येथील एका रूग्णाचा सामावेश आहे. आजच्या अहवालांमुळे जिल्ह्याची एकुण करोनाग्रस्तांची संख्या 521 झाली आहे. यामध्ये मालेगावचे 420 आहेत, दरम्यान आज दिवसभरात 149 करोनाचे संशयित रूग्ण दाखल झाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 30 हजार 116 रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 4473 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 3352 निगेटिव्ह, 521 पॉझिटिव्ह आले आहेत. 702 संशयित रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 600 अहवाल प्रलबिंत आहेत. 19 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण पुर्ण बरे होऊन मुक्त झाले आहेत.

* इतर तालुक्यांत स्थिती
* नाशिक 10
* चांदवड 2
* सिन्नर 5
* निफाड 3
* नांदगाव 2
* येवला 25
* सटाणा 1
* मालेगाव ग्रामिण 11
* जिल्हाबाहेरील 18

* एकूण कोरोना बाधित: 521
* मालेगाव : 420
* नाशिक : 26
* एकूण मृत्यू: 19
* कोरोनमुक्त : 46
* उर्वरित जिल्हा : 57

- Advertisment -

ताज्या बातम्या