१७ ‘शिवशाही’ बसेस नाशकात दाखल

0

नाशिक | दि. १५ प्रतिनिधी- नाशिकसाठी मिळालेल्या चार शिवशाही बसेस गेल्या आठवड्यात नागपूरला पळवण्यात आल्या होत्या. आज मात्र १७ ‘शिवशाही’ बसेस नाशिक शहरात दिमाखात दाखल झाल्या आहेत. आज पहाटेपासून या बसेस नाशिक-पुणे मार्गावर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. आज पहाटे साडेचार वाजता पहिली ‘शिवशाही’ ठक्कर बाजार बसस्थानकातून पुण्याच्या दिशेने निघाली.

यानंतर दर अर्ध्या तासाने एक बस याप्रमाणे या बस पुण्याला रवाना झाल्या व प्रवासी घेऊन पुण्याकडून परतल्या.नाशिक येथून मोठे प्रकल्प नागपूरला पळवण्याच्या सवयीप्रमाणे नाशिक येथे दाखल झालेल्या ४ शिवशाही बसेस दुसर्‍याच दिवशी नागपूरला पळवण्यात आल्या होत्या.

त्यामुळे नाशिककर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. शहरात लवकरच मोठ्या संख्येने ‘शिवशाही’ बसेस दाखल होतील, असे सांगून विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी वेळ मारून नेली होती.

मात्र त्यांचे हे म्हणणे खरे ठरले असून १७ ‘शिवशाही’ बसेस दिवाळीच्या पूर्वसंध्येला नाशकात टप्प्याटप्प्याने दाखल झाल्या.एकट्या कोल्हापूर आगारातून १३ शिवशाही बसेस आल्या आहेत. ४ ‘शिवशाही’ रायगड येथून आल्या आहेत. दिवाळीच्या काळात नाशिक व पुण्यातील प्रवाशांना या सेवेचा उपयोग होणार आहे.

२ ऑक्टोबरला शहरात दाखल झालेल्या शिवशाही बसचा दर शिवनेरी बसच्या तुलनेत कमी असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आताही या सेवेतून चांगला महसूल मिळेल, असा विश्‍वास एसटी अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

इतर मार्गांचे लवकरच नियोजन
नाशिक बस डेपोला १७ शिवशाही बस उपलब्ध झाल्या आहेत. या बसची मागणी व प्राथमिकता पाहता पुणे मार्गावर प्रथम सोडण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात अधिक बस उपलब्ध होणार असून पहिल्या व नवीन अशा गाड्यांची विभागणी करून इतर लांब पल्ल्याच्या मार्गांवर या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक

हंगामी दरवाढीचा धक्का
शनिवारी मध्यरात्रीपासून दिवाळीची हंगामी भाडेवाढ झाल्याने दरवाढीचा ङ्गधक्काफ प्रवाशांना बसला आहे. नाशिक-पुणे दरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांना शिवशाही, शिवनेरी, एशियाड या बससेवेसाठी ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. नाशिक-पुण्यासाठी ङ्गशिवशाहीफच्या दरात ७० रुपयांची वाढ होऊन ती ३४६ वरुन ४१६ झाली. शिवनेरीच्या दरात १२१ रुपयांची भाडेवाढ होऊन ६०५ दरावरुन थेट ७२६ दरवाढ झाली आहे. तर एशियाडच्या दरात ५० रुपयांनी वाढ होऊन ती ३१६ वरुन ३६६ वर पोहोचली आहे. ३१ ऑक्टोंबरपर्यत हंगामी भाडेवाढ लागू राहणार असून एसटीला चांगला महसूल मिळण्याची आशा आहे.

अशा धावल्या शिवशाही
पहाटे साडेचार वाजता पहिली शिवशाही धावली. त्यानंतर सकाळी ५.४५, ६.१५, ६.४५, ७.१५, ८.१५ दुपारी २.१५, २.४५, ३.१५, ३.४५, ४.१५, सायंकाळी ५.१५, ५.४५, ६.१५, ६.४५, ७.१५ या वेळेप्रमाणे ‘शिवशाही’ आज दिवसभर पुण्याच्या दिशेने धावल्या.

LEAVE A REPLY

*