Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुंबईतील डोंगरी बाजारात १६८ किलो कांद्याची चोरी

Share

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून कांदा भावात वाढ झाली असून सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच मुंबईतील डोंगरी मार्केटमध्ये १६८ किलो कांद्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान आज कांद्याच्या भावात घसरण झाली असली तरी मागील काही दिवसांत कांद्याचे वाढते दराने डोळ्यात पाणी आणले होते. अशातच मुंबईतील पप्रसिद्ध असेलल्या डोंगरी मार्केट यार्डातून १६८ किलोच्या कांद्याची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. येथील अकबर शेख आणि इरफान शेख यांच्या कांदा शॉपमधून हा कांदा चोरीला गेला असून यामध्ये अनुक्रमे ११२ किलो व ५६ किलो असा कांदा चोरण्यात आला आहे.

त्यामुळे या दोघांनाही हा चोरीचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांनी त्वरित जवळील डोंगरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!