Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

POK मध्ये भारताची मोठी कारवाई; १६ दहशतवाद्यांना कंठस्नान

Share

file photo

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

पाकव्याप्त काश्मीरमध्ये नीलम व्हॅलीत झालेल्या धुमश्चक्रीत भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत १८ पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले आहेत तर १६ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.  गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाकिस्तानने भारतीय सीमेवर शस्त्रसंधीचे पाककडून उल्लंघन होत आहे. भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर भारतीय जवानांनेही याला जशास तसे उत्तर दिले.

भारतीय सुरक्षा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात दहशतवादी संघटनेचे कॅम्प उद्धवस्त करण्यात आले.

भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईत अन्य जिहादींचा खात्मा करण्यात आला आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यानंतर भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भारतीय लष्कराने पीओकेत लाँच पॅडवर कारवाई केल्याची माहिती रविवारी दिली.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईबद्दल लष्करप्रमुख यांचे अभिनंदन केले आहे. हे अभिनंदन करताना पीओकेतील कोणताही लाँच पॅड सुटता कामा नये, तसेच कारवाई करताना यात कोणत्याही निरपराध व्यक्तीला नुकसान पोहोचू नये यासाठी खबरदारीचे निर्देश आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!