Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या पोहोचली २९८ वर; मालेगावात आज पुन्हा १६ रुग्ण...

नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या पोहोचली २९८ वर; मालेगावात आज पुन्हा १६ रुग्ण आढळले; सहा पोलिसांचा समावेश

मालेगावमधील बाधित रुग्णांची संख्या 274 वर

मालेगाव | प्रतिनिधी 

मालेगावी १६ रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये सहा पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांचा समावेश आहे. आजच्या वाढलेल्या आकड्यामुळे मालेगावमधील करोनाबाधितांची संख्या २७४ वर पोहोचली आहे तर जिल्ह्यातील आकडा तीनशेच्या समीप म्हणजेच २९८ वर जाऊन पोहोचला आहे.

- Advertisement -

करोनाचा कहर शहरात सुरूच आहे. आज दुपारी आलेल्या अहवालात 16 संशयित रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत तर 122 जणांचे स्त्राव नमुने निगेटिव्ह आले आहेत. या 16 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सहा राज्य राखीव दलाचे जवान व पोलिसांचा समावेश आहे. शहरातील ओम महालक्ष्मी कॉलनी हिंगलाज नगर गुलशेर नगर नयापुरा आदी भागातून हे बाधित रुग्ण आढळून आले आहे प्रशासन यंत्रणेतर्फे बाधितांच्या निकटवर्तीयांना काँरन्टाईन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

बाधित रुग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील तान देखील वाढत आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून बाधित रुग्ण आढळून येत असल्याने या भागांना प्रतिबंधित क्षेत्रात सामील करण्यासाठी मनपा प्रशासन यंत्रणेची धावपळ उडत आहे.

काल सायंकाळपर्यंत मनपातर्फे 41 कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले होते. आज नव्याने इतर भागातून रुग्ण आढळून आल्याने झोनच्या संख्येत अधिक वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

कालपर्यंत एकूण ४२ पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना बंदोबस्ताच्या वेळी करोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, पुन्हा यात सहा पोलीस आणि जवानांची भर पडली असून संख्या आता ४८ वर पोहोचल्याने पोलीस दलासह राज्य राखीव दलात भीतीचे वातावरण आहे.

सिन्नर तालुक्यात रुग्ण आढळला

सिन्नर तालुक्यातील वडगाव सिन्नर येथे ३२ वर्षाच्या व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे आज सकाळी निष्पन्न झाले. हा रुग्ण तीन दिवसांपूर्वी मुंबईहून वडगावला आला असल्याचे समजते. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली असून हा रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आला होता याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. आज एक अहवाल सिद्ध झाल्यामुळे सिन्नरमधील रुग्णसंख्या तीनवर पोहोचली आहे.

विंचूरमध्ये खळबळ

आज मालेगावमध्ये आढळून आलेल्या पोलिसांमध्ये एक पोलीस विंचूर येथील असल्याही माहिती सोशल मीडियात पसरली होती. यामुळे विंचूरसह परिसरात दुपारपासून या विषयाचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणाबाबतची अधिक माहिती मिळू शकली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या