Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

ब्रह्मनाळ येथे बचावकार्यादरम्यान बोट उलटली; १६ नागरिकांचा मृत्यू

Share

सांगली | वृत्तसंस्था 

पुराच्या पाण्यातून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु असताना ब्रह्मनाळ गावात बोट उलटून १६ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत आठ पुरुष तर पाच महिला व बालकांचा समावेश आहे.  सर्व नागरिक ब्रह्मनाळचे रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. .

कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असताना पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात आज बोट उलटल्याची घटना घडली.

३० ते ३२ जणांच्या क्षमतेची बोट बचाव करण्यासठी क्षमतेपेक्षा अधिक जन यात बसले होते. त्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

पलूस सांगली येथे उलटलेली बोट ही ग्रामपंचायतीची असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू करण्यात आले असलायची माहिती आपत्ती व्यवस्थापनकडून देण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!